शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, कोल्हापुरात समाजवादी पक्षाचे धरणे आंदोलन 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: February 26, 2024 16:03 IST

शेतमालाला हमी भावासह विविध मागण्यांसाठी दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन

कोल्हापूर : शेतमालाला हमी भावासह विविध मागण्यांसाठी दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे दाखल करा. भारतरत्न स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी समाजवादी पक्षाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.प्रदेश महासचिव शिवाजीराव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यामध्ये २३ पिकांची हमी भावाप्रमाणे खरेदी करा, शेतकऱ्यांची कर्जे माफ करा, शेतकऱ्यांना ५८ वर्षानंतर पेन्शन सुरु करा, शेतजमिनींचे भूसंपादन २०१३ च्या कायद्यानुसार करा, धान्याच्या आयात शुल्कात वाढ करा, नुकसानीचे मुल्यांकन शेतकरीनिहाय करावे, भारतीने जागतिक व्यापार संघटनेच्या करारातून बाहेर पडावे, पंतप्रधान विमा योजनेत सुधारणा करून विम्याचे पैसे शासनाने भरावे, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पिडितांना न्याय द्यावा, कृषी वस्तू, दुग्धजन्य पदार्थ फळे, भाजीपाला यांची आयात कमी करा, वीज बिले माफ करुन मोफत २४ तास वीज द्या या मागण्या मान्य कराव्यात. सध्या देशात दिवसाला दोन शेतकरी आत्महत्या करतात. दुर्देवाने यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी आंदोलने मोठ्या प्रमाणात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल असा इशारा देण्यात आला. यावेळी रवी जाधव, मुकुंद माळी, अनिल घाटगे, संभाजी जगदाळे, बाबू कदम, ए. एन. पाटील, सुभाष देसाई, रसूल नवाब, जावेद मोमीन, रफिक इस्माईल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपagitationआंदोलन