अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा बँकेत झुंबड

By Admin | Updated: April 9, 2015 01:05 IST2015-04-09T01:05:45+5:302015-04-09T01:05:51+5:30

३९८ जणांचे ५३१ अर्ज : सतेज पाटील, ए. वाय. पाटील यांचे शक्तिप्रदर्शनाने अर्ज

To file an application, the slum in the District Bank | अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा बँकेत झुंबड

अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा बँकेत झुंबड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसाठी (केडीसीसी) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उमेदवार, सूचक, अनुमोदक व समर्थकांची जिल्हा बँकेच्या परिसरात झुंबड उडाली होती. परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. दरम्यान, सकाळी साडेअकराच्या सुमारास माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य ए. वाय. पाटील यांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केले.
बुधवारी अखेरचा दिवस असल्यामुळे बँकेच्या तळमजल्यावर तालुका आणि गटनिहाय अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. सकाळी ११ पासून अर्ज भरण्यासाठी रीघ लागली होती. उमेदवारासोबत आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात समर्थक व्यस्त होते. दोन दिवसांत अर्ज दाखल केलेल्या दिग्गजांनी बुधवारी पुन्हा अर्ज दाखल केले. माजी मंत्री पाटील व ए. वाय. पाटील यांचे कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शक्तिप्रदर्शन केले. समर्थक आणि उमेदवारांच्या चारचाकी वाहनांमुळे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जिल्हा बँकेसमोरील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती.
गटनिहाय दाखल महत्त्वाच्या उमेदवारांची नावे अशी -
गट क्रमांक - १ : (विकास संस्था) आजरा - अशोक चराटी, अजित चराटी, अनिल देशपांडे, मुकुंद उर्फ उदयसिंह देसाई, सुधीर देसाई. भुदरगड - कल्याणराव निकम. चंदगड - सुरेशराव चव्हाण-पाटील, राजेश पाटील, नरसिंगराव पाटील, रामकृष्ण पाटील. गडहिंग्लज - बाबासाहेब आरबोळे, संतोष पाटील, जयकुमार मुन्नोळी, सचिन पाटील, बाबूराव पाटील, सोमगोंडा आरबोळे. गगनबावडा - सतेज पाटील, मानसिंग पाटील, बजरंग पाटील, पांडुरंग शिंदे. हातकणंगले - प्रदीप चौगुले, संजय मगदूम. कागल - दत्तात्रय वालावलकर, बाबासाहेब पाटील. करवीर - भगवानराव काटे, मनीषा पाटील. पन्हाळा - नीलेश उर्फ बाळासाहेब सरनाईक, दौलतराव पाटील, निपुण कोरे, अजित नरके, प्रकाश पाटील. राधानगरी - आनंदराव पाटील, शामराव भावके. शाहूवाडी - मानसिंगराव गायकवाड, सर्जेराव पाटील. शिरोळ - विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, अनिलकुमार यादव, राजेंद्र उर्फ भाऊसाहेब पाटील.
गट क्रमांक २ (खरेदी विक्री / प्रक्रिया संस्था) प्रकाश आवाडे, संभाजी पाटील, हसन मुश्रीफ, अशोकराव माने, विजयसिंह माने, सत्यजित पाटील, अखिलेश घाटगे, विजयसिंह माने, राजेंद्र पाटील.
गट क्रमांक ३ (अर्बन बॅँका / पतसंस्था) आनंदराव पाटील, सुनील पाटील, नीलेश सरनाईक, शेखर मंडलिक, संजय बडकडली, मुकुंद देसाई, सुधीर देसाई, अनिल पाटील.
गट क्रमांक -४ (दूध, पाणी, गृहनिर्माण व इतर)
भैया कुपेकर, धनाजीराव सरनोबत, सुरेश पाटील, आमदार हसन मुश्रीफ, माणिकराव पाटील (चुयेकर), बाळासाहेब सरनाईक, अरुण डोंगळे, रघुनाथ पाटील, सदाशिव नवणे, अजित नरके, गोविंद पाटील, संजय घाटगे, अमरीशसिंह घाटगे, संजय बटकडली, अशोक साळोखे, अमर उर्फ हंबीरराव पाटील, विश्वास पाटील, शशिकांत पाटील (चुयेकर), मुकुंदराव पोवार. महिला - माजी खासदार निवेदिता माने, अरुंधती जगदाळे, वेदांतिका माने, उदयानी साळुंखे, अंजना रेडेकर, सुजाता खानविलकर, सविता माने, भारती डोंगळे, सुनीता देसाई, सुयशा घाटगे, स्वाती कोरी, राजश्री मोरे.
इतर मागासवर्गीय - असिफ फरास, श्रीनिवास सातपुते, सर्जेराव पाटील, सुनील मोदी, संजय बटकडली, विकास पाटील.
अनुसूचित जाती - दत्तात्रय घाटगे, अशोकराव माने, दीपक भोसले, आमदार सुजित मिणचेकर, निवास कांबळे.
भटक्या-विमुक्त - बाबूराव हजारे, रवींद्र जानकर, धनाजी खोत, स्मिता गवळी, परशराम तावरे

Web Title: To file an application, the slum in the District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.