शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

विनायक राऊतांवर गुन्हा दाखल करा, ई स्टोअर फसवणूक प्रकरणी गुंतवणूकदार एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 13:29 IST

स्वयंघोषित उद्योगपती विनायक राऊत यांनी ई स्टोअर कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा केले.

गारगोटी: ई स्टोअर कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत अन्यथा पोलिस ठाण्याच्या हद्दीत लाक्षणिक उपोषण करणार, असा इशारा गुंतवणूकदारांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर दिगंबर कालेकर यांच्यासह शेकडो गुंतवणूकदार आणि नेटवर्कर यांच्या सह्या आहेत. रविवारी सकाळी मौनी विद्यापीठाच्या फुले सदन येथे ही एल्गार सभा झाली.निवेदनात म्हटले आहे की, स्वयंघोषित उद्योगपती विनायक राऊत यांनी ई स्टोअर कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा केले. ही कंपनी २०१९ साली सुरू झाली. या कंपनीचे कोणतेही कार्यालय नाही की थांगपत्ता नाही. या कंपनीकडून चांगला परतावा मिळतो आणि गुंतविलेल्या रक्कमेला मी जबाबदार आहे अशी खात्री दिली. अनेकांनी लाखो रुपयांची कर्जे काढून मॉलसाठी पैसे भरले. अनेकांना फसवून कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम राऊत याने जमा केली आहे.ही रक्कम कंपनीकडे पाठवली की आपल्याकडेच ठेवली याची ठोस माहिती आम्हाला नाही. परंतु ही रक्कम त्यांच्याकडेच असल्याचा आमचा संशय आहे. आमच्या एका टीमची सुमारे ३७ कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीच्या प्रकारात त्याचा भाऊ अनिल कृष्णा राऊत, पत्नी पद्मावती विनायक राऊत हे देखील सामील आहेत.याबाबत आम्ही पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी ती दाखल करून घेण्याऐवजी वेगवेगळी कारणे सांगून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे या ठगांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल न केल्यास पोलिस ठाण्याच्या हद्दीत आम्ही सर्व गुंतवणूकदार लाक्षणिक उपोषण करणार आहोत.या निवेदनावर दिगंबर कालेकर, विनायक भोसले, अनिल पाटील, राजेंद्र गोडसे, सज्जन पवार, प्रकाश कुंभार, डॉ.अभिजित पाटील, संदीप चौगले यांच्यासह शेकडो गुंतवणूकदार आणि नेटवर्कर यांच्या सह्या आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी