शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लिंकिंग सक्ती केल्यास खत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करा - मंत्री हसन मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:05 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सूचना

कोल्हापूर : ऊस व इतर पिकांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात युरिया, डीएपी व इतर खतांची मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांची गरज वाढल्याने या खतांसोबत लिंकिंग स्वरूपात अन्य कोणतेही खत अथवा मागणीव्यतिरिक्त इतर कोणत्याही निविष्ठांचे लिंकिंग आढळल्यास विक्रेता व खत उत्पादक कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मंत्रीहसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिल्या. लिंकिंगविरहित खताचा पुरवठा होत असल्याची खात्री कृषी विभागाने करावी. लिंकिंगसह खताचा तुटवडा असल्यास कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता एस. जी. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता नजीर नाईकवडी, कागल-राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले तसेच अन्य संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले की, मुरगुड येथील सर पिराजीराव तलावाच्या मागील बाजूला असलेल्या सांडव्यावर पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. उत्तूर मध्ये क्रीडांगणासाठी गायरानातील ५ एकर जागा देण्याबाबत तहसीलदारांनी कार्यवाही करावी. युरिया व डीएपी संरक्षित साठा वितरण झाल्याप्रमाणे दोन्ही खतांची उचल होऊन ही खते शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्याची तपासणी करा.

जिल्हाधिकाऱ्यांचे केले कौतुकमुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या लोकार्पण सोहळ्याला विविध भागांतून न्यायमूर्ती, न्यायाधीश, वकील व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हा सोहळा नियोजनबद्ध व भव्य पद्धतीने पार पडला, यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांचे कौतुक केले.