जमिनीच्या वादातून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:29+5:302021-05-31T04:19:29+5:30

मलकापूर : वालूर (ता. शाहूवाडी) येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारामारीत इस्माईल युसूफ झांजी (वय ...

Fights over land disputes | जमिनीच्या वादातून मारामारी

जमिनीच्या वादातून मारामारी

मलकापूर :

वालूर (ता. शाहूवाडी) येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारामारीत इस्माईल युसूफ झांजी (वय ३२) यांच्यासह चौघांना लोखंडी पाईप, काठ्या, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी दहा जणांविरोधात शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांतून मिळविलेली माहिती अशी की, इस्माईल झांजी व आरोपीचा गट नंबर १९६ मधील जमिनीसंदर्भात कोर्टात दावा सुरू आहे. रविवार दि.३० हे रोजी आरोपी इसाक इस्माईल देवळेकर हा जमिनीत रोटर मारत होता. यावेळी इस्माईल झांजी हे आमची जमीन असून तू येथे काय करू नकोस असे सांगत असताना त्यांच्या इसाक देवळेकर यांनी जावेद इसाक देवळेकर यांच्या हातातील पातळी घेऊन फिर्यादीचा भाऊ अब्दुल देवळेकर यांना मारहाण करून जखमी केले. यात इस्माईल युसूफ झांजी, युसूफ इस्माईल झांजी, समीक्षा इस्माईल झांजी, तस्लिमा जमीर घोरी या चौघांना जखमी केल्याप्रकरणी इसाक इस्माईल देवळेकर, जावेद इसाक देवळेकर, अब्दुल इसाक देवळेकर, मेहरअली इसाक देवळेकर, अदनान याकूब देवळेकर, जोहरमियाँ देवळेकर, सकिनामियाँ देवळेकर, सादिका याकूब देवळेकर, दिलवाले अब्दुल देवळेकर व शिरा जावेद देवळेकर, सर्व जण रा. वालूर यांच्या विरोध शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोहेकाॅ. एस. व्ही. काशीद करीत आहेत.

Web Title: Fights over land disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.