जवाहरनगरात मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:24 IST2021-04-07T04:24:13+5:302021-04-07T04:24:13+5:30

कोल्हापूर : किरकोळ कारणावरुन तरूणास जवाहर नगरातील दत्त कॉलनीत कोयता, काठीने मारहाण करण्याचा प्रकार घडला. गणेश पांडुरंग सुतार (वय ...

Fights in Jawaharnagar | जवाहरनगरात मारामारी

जवाहरनगरात मारामारी

कोल्हापूर : किरकोळ कारणावरुन तरूणास जवाहर नगरातील दत्त कॉलनीत कोयता, काठीने मारहाण करण्याचा प्रकार घडला. गणेश पांडुरंग सुतार (वय ३० रा. शालीमार लॉन, दत्त कॉलनी, जवाहनगर) असे जखमीचे नाव आहे. या मारहाण प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश सुतार हे आपल्या घराच्या दारात उभे असताना किरकोळ कारणावरुन वाद वाढत गेला व सूर्यकांत मारुती खंदारे (रा. पाचगाव, ता. करवीर) व सागर दिनकर सोनवणे (रा. जवाहरनगर) या दोघांनी सुतार यांच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याची मोडतोड केली. तसेच कोयता, काठीने त्याच्यावर हल्ला करुन जखमी केले. हल्लेखोरांनी सुतार यांच्या दारातील अनिल धोंडीराम मोरे यांची दुचाकीची ही मोडतोड केली. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Fights in Jawaharnagar