सडोलीत दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:28 IST2021-03-01T04:28:20+5:302021-03-01T04:28:20+5:30

कोल्हापूर : सडोली दुमाला (ता. करवीर) येथे फुटबॉल खेळताना जवळून गेल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला. याप्रकरणी ...

Fighting in two groups in Sadoli | सडोलीत दोन गटात हाणामारी

सडोलीत दोन गटात हाणामारी

कोल्हापूर : सडोली दुमाला (ता. करवीर) येथे फुटबॉल खेळताना जवळून गेल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला. याप्रकरणी रविवारी करवीर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सडोली दुमाला येथे शनिवारी सायंकाळी फुटबॉल खेळताना किरकोळ कारणावरून दोन गटात मारामारी झाली. दोन्हीही गटाकडून दगड व काठ्यांचा वापर करण्यात आला. करवीर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी १७ संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत.

रूपेश विलास पोवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित ऋषिकेश कांबळे, जालिंदर कांबळे, अपर्णा कांबळे, हर्षद अतिग्रे, बालाजी अतिग्रे, विकास कांबळे, प्रथमेश पारखे यांच्यावर गुन्हा दाखल केला, तर ऋषिकेश जालिंदर कांबळे यांच्या तक्रारीनुसार, संशयित रूपेश पोवार, राहुल पोवार, जयदीप पोवार, सुदेश पोवार, रोहित पोवार, नितीन पोवार, दीपक पोवार, आनंदा पोवार, विलास पोवार व संकेत पोवार यांच्यावर रविवारी गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: Fighting in two groups in Sadoli