मोहरेत पारंपरिक गटांमध्ये लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:20+5:302021-01-13T05:01:20+5:30
देवाळे : मोहरे (ता. पन्हाळा) येथे पारंपरिक गटात तिरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे, माजी ...

मोहरेत पारंपरिक गटांमध्ये लढत
देवाळे : मोहरे (ता. पन्हाळा) येथे पारंपरिक गटात तिरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे, माजी सरपंच शिवाजी पाटील गट विरुद्ध माजी उपसरपंच दिलीप भोसले गट व सुनील पाटील यांच्या गटात चुरशीने लढत होत आहे. विद्यमान सरपंच गट दोन्ही पॅनेलमध्ये विभागल्याने शिवाजी मोरे व शिवाजी पाटील गटाचे मनोमिलन झाले आहे. सत्ताधारी जनसुराज्य गाव विकास पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच शिवाजी पाटील व जि. प. सदस्य शिवाजीराव मोरे करत आहेत. विरोधी ज्योतिर्लिंग ग्राम विकास आघाडीचे नेतृत्व दिलीप भोसले करत आहेत, तर भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व सुनील पाटील करीत आहेत. एकूण सदस्य संख्या 11 असून 3385 मतदार आहेत.
गतवेळी जि. प. सदस्य शिवाजीराव मोरे व विद्यमान सरपंच शिवाजी पाटील यांच्या गटात सरळ लढत झाली. प्रभाग क्रमांक एकमध्ये तीन जागांसाठी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीमध्ये कोण कुठे बाजी मारणार, याची चर्चा सुरू आहे.