मनपाडळेत पारंपरिक गटांत दुरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:50+5:302021-01-08T05:19:50+5:30

दिलीप चरणे लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीसाठी पारंपरिक गटांत दुरंगी लढत होत आहे. ...

Fighting in traditional groups in Manpadle | मनपाडळेत पारंपरिक गटांत दुरंगी लढत

मनपाडळेत पारंपरिक गटांत दुरंगी लढत

दिलीप चरणे लोकमत न्यूज नेटवर्क

नवे पारगाव : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीसाठी पारंपरिक गटांत दुरंगी लढत होत आहे. वारणा बँकेचे माजी संचालक हंबीरराव शिंदे गट विरुद्ध माजी सरपंच राजेंद्रकुमार पाटील गट अशा मुख्य दोन गटांत चुरशीची निवडणूक होत आहे. गावातील सूर्यवंशी गट दोन्ही पॅनेलमध्ये विभागला गेला असल्याने येथे रंगतदार लढती होण्याचे संकेत आहेत.

सत्ताधारी हंबीरराव शिंदे गटाची राजर्षी शाहू छत्रपती ग्रामविकास आघाडी असून, या गटाचे नेतृत्व हंबीरराव शिंदे, संजय पाटील व विठ्ठलराव सूर्यवंशी करत आहेत. विरोधी गटाच्या माजी सरपंच राजेंद्रकुमार पाटील यांच्या गटाच्या जुगाईदेवी ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व राजेंद्र कुमार पाटील, जयदीप सूर्यवंशी, भरत सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, वसंत चौगुले व कोंडीराम भोसले सांभाळत आहेत. सदस्य ११ असून, अडीच हजार मतदार आहेत. गतवेळी शिंदे गटाने नऊ, तर पाटील गटाने दोन जागा जिंकल्या होत्या.

सरपंच आरक्षण गुलदस्त्यात असल्यामुळे प्रत्येक प्रभागात काटाजोड लढती होत आहेत. प्रभाग तीनमध्ये जुगाई पॅनेलच्या राजलक्ष्मी राजेंद्रकुमार पाटील विरुद्ध शाहू पॅनेलच्या सुनीता राजेंद्र शिंदे व अनिल घोडके विरुद्ध उदय पाटील या लढती लक्षवेधी ठरणार आहेत. प्रभाग चारमध्ये शिंदे गटाचे माजी उपसरपंच रायबाराजे हंबीरराव शिंदे विरुद्ध पाटील गटाचे नितीन वसंतराव सूर्यवंशी ही मुख्य लढत होत असताना येथे मनपाडळे विकास संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण शिंदे व राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष संजय शिंदे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने या प्रभागातील रंगत वाढली आहे.

Web Title: Fighting in traditional groups in Manpadle