घराच्या व्यवहाराच्या कारणावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST2021-06-25T04:18:59+5:302021-06-25T04:18:59+5:30

निरंजन मांजरे, राजू मांजरे, शारदा मांजरे, राधिका मांजरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अधिक माहिती अशी वरील संशयित ...

Fighting over the cause of the house transaction | घराच्या व्यवहाराच्या कारणावरून हाणामारी

घराच्या व्यवहाराच्या कारणावरून हाणामारी

निरंजन मांजरे, राजू मांजरे, शारदा मांजरे, राधिका मांजरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अधिक माहिती अशी वरील संशयित आरोपी व तक्रारदार हे नात्याने भाऊ बंद असून त्याच्यात घराच्या व्यवहारावरून वाद आहे. रविवारी ( 19 ????) रोजी नागेश हे रिक्षा मागे घेत असताना निरंजन याने पाठीमागून येऊन जोराची धडक दिली. याबाबत नागेश यांनी निरंजन याला विचारले असता त्याने घरात घुसून बाबासोा यांना ढकलून देत त्यांच्या पाठीमध्ये लोखंडी हातोड्याने मारहाण केली. घराचे कुलूप तोडून नागेश व त्याचा भाऊ योगेश याच्या डोक्यात व पाठीत मारहाण करून जखमी केले. तसेच राजू, शारदा व राधिका यांनी निरंजन, त्यांचे वडील व भाऊ यांना शिवीगाळ करून लोखंडी हातोडा, लाकडी बॅटन पट्टी, बारडी व लाकडी ओंडक्याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Fighting over the cause of the house transaction