वाळोली येथे शेतजमिनीच्या वादातून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:34 IST2021-02-26T04:34:55+5:302021-02-26T04:34:55+5:30

बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील वाळोली येथे शेतातील सामाईक सिमेंटची पाइपलाइन काढण्याच्या कारणावरून मारामारी झाली. त्यामध्ये एकजण जखमी असून, चार ...

Fighting over agricultural land dispute at Waloli | वाळोली येथे शेतजमिनीच्या वादातून मारामारी

वाळोली येथे शेतजमिनीच्या वादातून मारामारी

बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील वाळोली येथे शेतातील सामाईक सिमेंटची पाइपलाइन काढण्याच्या कारणावरून मारामारी झाली. त्यामध्ये एकजण जखमी असून, चार जणांवर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वाळोली येथील संतोष लक्ष्मण पाटील व संजय गणपती पाटील हे भाऊबंद असून, शेतातील सामाईक सिमेंटच्या पाइपलाइनच्या कारणावरून वाद आहे. त्यांची दोघांची एकत्र शेती असून, जेसीबीच्या साहाय्याने सिमेंट पाइप उकरत असताना विरोधकांनी संतोष पाटील यांना चिव्याच्या काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संजय गणपती पाटील, प्रकाश गणपती पाटील, बाजीराव गणपती पाटील, राजाराम गणपती पाटील (सर्व रा. वाळोली) यांच्या विरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. पोवार करत आहेत.

Web Title: Fighting over agricultural land dispute at Waloli