म्हाळुंगे येथे दीर-भावजयीमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:22 IST2021-03-25T04:22:52+5:302021-03-25T04:22:52+5:30

याबाबत अधिक माहिती अशी, प्रकाश विष्णू पाटील हे पत्नी पूजा यांच्यासह घराच्या पाठीमागील बाजूस वडिलांच्या नावे असलेल्या नळावर ...

Fighting in Deer-Bhavjayi at Mahalunge | म्हाळुंगे येथे दीर-भावजयीमध्ये हाणामारी

म्हाळुंगे येथे दीर-भावजयीमध्ये हाणामारी

याबाबत अधिक माहिती अशी, प्रकाश विष्णू पाटील हे पत्नी पूजा यांच्यासह घराच्या पाठीमागील बाजूस वडिलांच्या नावे असलेल्या नळावर पाणी भरत होते. यावेळी मालती विष्णू पाटील यांनी तू आमच्या परड्यात पाणी भरायचे नाही, असे ओरडून सांगत असताना पूजा परड्यात आली असता मालतीने पूजा हिला शिवीगाळ करून तिचे केस ओढून जमिनीवर पाडले. मनिषा पाटील हिने लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. हे भांडण सोडविण्यास गेलेल्या प्रकाश याला रामलिंग पाटील, विक्रम रामलिंग पाटील, विष्णू लक्ष्मण पाटील व रोहित रामलिंग गुरव (रा. तुडये) यांनी काठीने माराहण केली. तर प्रकाश पाटील यांचा मोबाईल या भांडणात फोडल्याची फिर्याद प्रकाश पाटील दिली आहे.

पाण्याच्या नळावर भरलेला हंडा बाजूला ठेवल्याच्या कारणावरून मनिषा रामलिंग पाटील यांना प्रकाश पाटील व पूजा पाटील या नवरा बायकोने मालती हिचे केस ओढून जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर मालती हिच्या डोक्याला दगड मारून जखमी केल्याची फिर्याद मनिषा पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Fighting in Deer-Bhavjayi at Mahalunge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.