गटातील बाराजण जखमी झाले असून, या प्रकरणी दोन्ही गटांच्या बाराजणांविरोधात हुपरी पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, तळंदगे येथील तरुण व तरुणीने काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला. या विवाहामध्ये मध्यस्थी केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून येथील दत्त डेअरीसमोर दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यात दोन्ही गटांतील बाराजण जखमी झाले. सर्जेराव वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अजित हाक्के, बाजीराव दाइंगडे, किरण दाइंगडे, प्रमोद दाइंगडे, रितेश दाइंगडे, माणिक हाक्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच अजित हाक्के यांच्या फिर्यादीवरून सर्जेराव वाघमोडे, सुरेश वाघमोडे, बाजीराव वाघमोडे, उदय वाघमोडे, अमोल शिंदे, राजेंद्र वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.