फायटर्स स्पोर्टस क्लब ‘ब’ उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:24 IST2021-03-27T04:24:21+5:302021-03-27T04:24:21+5:30
कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या वसंतराव चौगुले चषक ‘ब’ गट क्रिकेट स्पर्धेत फायटर्स स्पोर्टस क्लब ‘ब’ने पॅकर्स ...

फायटर्स स्पोर्टस क्लब ‘ब’ उपांत्य फेरीत
कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या वसंतराव चौगुले चषक ‘ब’ गट क्रिकेट स्पर्धेत फायटर्स स्पोर्टस क्लब ‘ब’ने पॅकर्स स्पोर्टस क्लब फौंडेशनचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
राजाराम काॅलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात ‘पॅकर्स’ने प्रथम फलंदाजी करीत २६.५ षटकांत सर्वबाद १०६ धावा केल्या. यात सिद्धार्थ वाझे २९, पृथ्वीराज उन्हाळकर व प्रतीक सावर्डेकर यांनी नाबाद ११ धावा केल्या. ‘फायटर्स’कडून गोलंदाजी करताना धनराज सोनुले, सोहम घाळी यांनी प्रत्येकी तीन, तुषार असोळेने दोन, शुभमकार माने व पारितोष वराडकर यांंनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना ‘फायटर्स’ने आव्हान १५.३ षटकांत ४ बाद १०९ धावा करीत सहज पार करीत विजयासह उपांत्य फेरीत मजल मारली. यात पारितोष वराडकरने नाबाद ५४, शुभम मेढेने १८ धावा केल्या. ‘पॅकर्स’कडून पृथ्वीराज उन्हाळकर, सुमित कदम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.