कोगेत शिवसेना विरुद्ध कॉग्रेसमध्ये दुरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:44+5:302021-01-13T05:01:44+5:30
गतवेळीच्या निवडणुकीत एका जागेचा अपवाद वगळता ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. शिवसेनेचे स्थानिक नेते व कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक ...

कोगेत शिवसेना विरुद्ध कॉग्रेसमध्ये दुरंगी लढत
गतवेळीच्या निवडणुकीत एका जागेचा अपवाद वगळता ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती.
शिवसेनेचे स्थानिक नेते व कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश कुंडलिक पाटील व भगवान रामा पाटील हे दोन संचालक एकत्र येऊन आघाडीचे नेतृत्व करीत आहेत; तर विरोधी कॉग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, प्रा. बाजीराव पाटील, यशवंत बँकेचे संचालक पै. उत्तम पाटील, माजी सरपंच प्रकाश सखाराम पाटील, शाहू गूळ खरेदी-विक्री संघाचे संचालक बळिराम चव्हाण, राजीवजी सूतगिरणीचे संचालक सदाशिव निकम, कुंभी-कासारीचे माजी संचालक कृष्णात पाटील, निवृत्ती खरेदी-विक्री संघाचे संचालक आनंदा रामा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस आघाडी अशी दुरंगी लढत मोठी प्रतिष्ठेची बनली आहे.
एकूण जागा = १३
..............................................................
प्रभाग = ५
एकूण मतदान = ३८४३