शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा हजार गरजूंना मिळाला दिलासा : आमदार जाधव यांनी दिले जीवनावश्यक मदतीचे किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 17:32 IST

पालकमंत्री पाटील यांनी या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले. पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू अशा वस्तूंचा समावेश असलेले हे जीवनावश्यक किट आहे. जीवनावश्यक वस्तूंचे पॅकिंग व त्यांच्या वितरणाची पूर्ण जबाबदारी दीपक चोरगे व त्यांचे सहकारी सांभाळत आहेत.

ठळक मुद्देमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते वाटपाला सुरुवात : उत्तर मतदारसंघातील गरजूंना मदतीचा हात

कोल्हापूर : काँगे्रसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या वतीने उत्तर विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब १५ हजार नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी साहित्य वाटपाला सुरुवात झाली. यावेळी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, नगरसेवक संभाजी जाधव, सचिन पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, उद्योजक उदय दुधाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोणा विषाणूमुळे लॉकडाऊन केल्याने अनेकांचे रोजगार बंद असून, महिना झाले ते घरातच थांबून आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न आहे. अशा गोरगरीब जनतेला मदतीचा हात देण्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. १५ हजार गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात येत आहे. दोन टप्प्यांत देण्यात येणाऱ्या मदतीला पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी किटसच्या वाटपाने सुरुवात झाली. पालकमंत्री पाटील यांनी या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले. पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू अशा वस्तूंचा समावेश असलेले हे जीवनावश्यक किट आहे. जीवनावश्यक वस्तूंचे पॅकिंग व त्यांच्या वितरणाची पूर्ण जबाबदारी दीपक चोरगे व त्यांचे सहकारी सांभाळत आहेत. यावेळी संपतराव पाटील, किरण मेथे, संग्राम गायकवाड, किशोर खानविलकर, स्वप्निल साळोखे, दुर्गेश लिंग्रस, कमलकार जगदाळे, संभाजी पोवार उपस्थित होते. 

महाविकास आघाडीकडून गरजूंना मदत केली जात आहे. यामधून कोणी वंचित राहत असेल त्यांना लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था मदत करीत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील या संदर्भात सर्वांशी समन्वय ठेवून आहेत. यामध्ये खारीचा वाटा म्हणून शासनाच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या १५ हजार कुटुंबांना आपणाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. प्र्रभागनिहाय संबंधित नगरसेवकांकडून यादी घेऊन किटच वाटप घरपोहच केले जाणार आहे.- चंद्रकांत जाधव, आमदार 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस