शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गड किल्ले भाड्याने दिल्यास उग्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 11:37 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात गडकोट किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मात्र शासनाने हे किल्ले विकसकांना भाड्याने देण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला डिवचले आहे. हा निर्णय शासनाने त्वरित मागे न घेतल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोमवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे.

ठळक मुद्देगड किल्ले भाड्याने दिल्यास उग्र आंदोलनकोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा इशारा

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात गडकोट किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मात्र शासनाने हे किल्ले विकसकांना भाड्याने देण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला डिवचले आहे. हा निर्णय शासनाने त्वरित मागे न घेतल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोमवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे.काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत किल्ल्यांची वर्गवारी करून काही किल्ले विकसकांना भाडेतत्वावर देण्याचे ठरले आहे. त्या ठिकाणी हॉटेल, मंगल कार्यालय, लॉज व अन्य व्यवसायाची परवानगी देण्यात येणार आहे.स्वराज्य निर्मिती करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या शौर्य व बुद्धिमत्तेबरोबरच गनिमी कावा, युद्धनीती व गड-किल्ल्यांची महत्त्वाची साथ लाभली. महाराजांनी किल्ले बांधणीबरोबरच काही किल्ले जिंकून त्यांची डागडुजी करून त्यांचा विकास केला.

हे किल्ले महाराष्ट्राची शान व अस्मिता असून, त्यांचे पावित्र्य व इतिहास चिरंतन राहिले पाहिजे; मात्र शासनाच्या निर्णयामुळे किल्ल्यावर अवैध धंद्याचीही निर्मिती होण्याची शक्यता आहे; त्यामुळे हा अविचारी निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा.

शिष्टमंडळात शहर काँग्रेस अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, संपतराव पाटील, किशोर खानविलकर, तौफिक मुल्लाणी, प्रताप जाधव, मंगल खुडे, रणजित पोवार, उदय चव्हाण, किरण मेथे, संग्राम गायकवाड, संजय पोवार, संध्या घोटणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसFortगडkolhapurकोल्हापूर