शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

‘कन्यागत’ ठरतेय भाविकांसाठी पर्वणी

By admin | Updated: August 13, 2016 00:37 IST

गंगास्नानासाठी गर्दी : वर्षभर होणार लाभ

संदीप बावचे / संतोष बामणे  -जयसिंगपूर --कन्यागत महापर्वकाळाचा प्रारंभ होताच हजारो भाविकांनी शुक्रवारी गंगास्नान केले. हा सोहळा यापुढे वर्षभर चालणार आहे. देवस्थान समिती, ग्रामपंचायत, पोलिस व प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने नृसिंहवाडीचा कन्यागत मुख्य सोहळा दिमाखदारपणे साजरा झाला. २ फेब्रुवारीला आमदार उल्हास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कन्यागत महापर्वकाळासाठी १२१ कोटींचा भरघोस निधी प्राप्त झाला होता. यानंतर नृसिंहवाडी, औरवाड, गौरवाड, आलास, शेडशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी, आदी गावांत स्नानासाठी विविध ठिकाणी सोय करण्यात आली. तसेच तालुक्याच्या विकासात मोठी भर पडली. कन्यागतच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी देवस्थान समिती, पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन, एस. टी. महामंडळ, आरोग्य विभाग, पालक, मंत्री, आमदार, खासदार यांच्या नियोजनामुळे गुरुवार (दि. ११) पासून कन्यागत पर्वाला प्रारंभ झाला. यात शिरोळ, नृसिंहवाडी, कवठेगुलंद, गणेशवाडी, औरवाड, आदी पालख्या स्नानासाठी रवाना झाल्या व मोठ्या उत्साहात स्नान सोहळा शुक्रवारी (दि. १२) पार पडला. शिरोळ येथे भोजनपात्र पालखी मिरवणूक गुरुवारी सायंकाळी काढण्यात आली. यामध्ये ‘श्रीं’च्या पालखीचे हत्ती, घोडे, उंट व संगीताच्या निनादात शिरोळ शहरातून भव्य स्वागत केल्यानंतर शुक्रवारी सकाळी मुख्य स्नान शुक्लतीर्थ येथे पार पडले. त्यानंतर ही पालखी शिरोळकडे प्रस्थान झाली. भोजनपात्र मंदिरात दिवसभर पालखीचे दर्शन भाविकांनी घेतले. दत्त मंदिर व्यवस्थापन आणि उत्सव समितीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. नृसिंहवाडीत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात होत्या. तसेच औरवाड मार्गावर रस्त्याकडेला पार्किंग केलेली चारचाकी वाहने क्रेनच्या सहायाने उचलून पार्किंगच्या ठिकाणी लावली जात होती. तसेच अनेक मुख्य मार्गांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळविली जात होती, तर तालुका आरोग्य अधिकारी प्रसाद दातार यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहवाडी, औरवाड, गणेशवाडी, शेडशाळ, कवठेगुलंद, गौरवाड, आदी ठिकाणी १८ वैद्यकीय पथके सज्ज होती. ठिकठिकाणी रुग्णवाहिकाही तयार होत्या.लोकमतचा विशेष अंक : वाचकांच्या उड्याकन्यागत महापर्वकाळाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने शुक्रवारी (दि. १२) कन्यागत महापर्वकाळाच्या दिवशी विशेष अंक प्रकाशित केला होता. कन्यागतची परिपूर्ण माहिती असलेल्या या अंकाचे भाविकांनी स्वागत केले. ‘लोकमत’चा हा विशेष अंक संग्रहित असल्याच्या भावना वाचकांनी व्यक्त तोफेची सलामी‘श्रीं’च्या पर्वकाळ स्नानानंतर शिरोळ येथील ऐतिहासिक जय भवानी तोफ उडविण्यात आली. ‘श्रीं’चे विधिवत गंगास्नान सुरू होत असताना एकवीरा भजनी मंडळ यांनी गंगा व कृष्णा लहरीचा पाठ केला. ‘श्रीं’च्या स्नानानंतर भाविकांनी औरवाड पुलानजीकचा घाट, पापविनाशी तीर्थघाट, मुख्य मंदिर परिसर, अन्नछत्र डेक परिसर, कृष्णा-पंचगंगा संगम परिसरात स्नान केले.तात्पुरते बसस्थानकनृसिंहवाडी येथे सुसज्ज बसस्थानक आहे; परंतु वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी कुरुंदवाड, शिरोळ मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तात्पुरते बसस्थानक उभारले आहे. येथे सांगली, कोल्हापूर, सातारा या आगारांतून विशेष गाड्यांची सोय केली आहे. निपाणी, बेळगाव, चिक्कोडी परिसरातील एस. टी. बसेसची सोय केली आहे.मंदिरांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीकन्यागत महापर्वकाळाच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती संजय घोडावत यांच्या सहकार्यातून व आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नातून शुक्रवारी नृसिंहवाडी येथे दत्त मंदिर, शुक्लतीर्थ, औरवाडमधील अमरेश्वर मंदिर, आदी परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी पांडुरंग माने, धनाजी पाटील-नरंदेकर आदी सहभागी झाले होते.