कचरा निविदा अपात्र संस्थेस देण्याचा घाट

By Admin | Updated: July 10, 2017 23:30 IST2017-07-10T23:30:31+5:302017-07-10T23:30:31+5:30

इचलकरंजी नगरपालिका : नामवंत संस्थेला डावलून विशिष्ट संस्थेसाठी वाटाघाटी

Ferries to give waste to Tender Forth Agency | कचरा निविदा अपात्र संस्थेस देण्याचा घाट

कचरा निविदा अपात्र संस्थेस देण्याचा घाट

लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर स्वच्छतेसाठीची निविदा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, निविदेसाठी अपात्र ठरलेल्या संस्थेला ठेका देण्याचा उपद्व्याप नगरपालिकेतून सुरू आहे. विशेष म्हणजे यामध्ये नामवंत संस्थेला डावलून विशिष्ट संस्थेला ठेका देण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे कचरा उठावच्या ठेक्याची चविष्ट चर्चा नगरपालिका वर्तुळात आहे.
शहरामध्ये दररोज सुमारे १५० टन कचरा गोळा करून तो आसरानगर येथे असलेल्या कचरा डेपोवर टाकला जातो. हा कचरा शहरात असलेल्या २५ वॉर्डांपैकी २० वॉर्डांमध्ये नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत गोळा केला जातो, तर अन्य पाच वॉर्डांत कचरा गोळा करण्यासाठी खासगी ठेका देण्यात आला आहे. याशिवाय विशिष्ट ठिकाणी गोळा करण्यात आलेला कचरा ट्रॅक्टर-ट्रॉल्यांमार्फत वाहून नेऊन तो कचरा डेपोवर टाकण्यासाठीसुद्धा खासगी ठेका कार्यरत आहे.
अशा प्रकारे शहरातील कचरा जमा करून तो विशिष्ट ठिकाणी टाकण्याचा ठेका नगरपालिकेने एका निविदेमार्फत देऊ केला आहे. त्यासाठी वार्षिक ३ कोटी ४० लाखांची निविदा काढण्यात आली असून, पाच संस्थांनी सदरची निविदा भरली आहे. त्यापैकी दोन संस्था अपात्र ठरल्या असून, उर्वरित तीन संस्था पात्र
ठरल्या आहेत. पात्र ठरलेल्या संस्थेमध्ये एक नामांकित संस्था असून, त्या संस्थेऐवजी अपात्र ठरलेल्या संस्थेस ठेका देण्यासाठी नगरपालिकेकडील एक यंत्रणा कार्यरत झाली आहे.


प्रशासनाकडून सावळा गोंधळअपात्र ठरलेल्या संस्थेस ठेका मिळण्यासाठी नामांकित असलेल्या संस्थेच्या त्रुटी शोधून त्या फसव्या पद्धतीने समोर मांडण्याचे काम या यंत्रणेने सुरू केले आहे.
अपात्र संस्थेची सुपारी घेऊन नगरपालिका व अन्य शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

Web Title: Ferries to give waste to Tender Forth Agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.