वीर जवानांच्या कुटुंबांचा सत्कार

By Admin | Updated: December 15, 2014 23:58 IST2014-12-15T23:39:44+5:302014-12-15T23:58:11+5:30

महापालिकेचा वर्धापनदिन उत्साहात : उपमहापौरांच्या हस्ते ध्वजारोहण

Felicitates families of heroic soldiers | वीर जवानांच्या कुटुंबांचा सत्कार

वीर जवानांच्या कुटुंबांचा सत्कार

कोल्हापूर : महापालिकेच्या ४२व्या वर्धापनदिनानिमित्त आज, सोमवारी कर्मवीर विठ्ठल रामजी चौकात उपमहापौर मोहन गोंजारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशरक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या वीरजवानांच्या तसेच अग्निशमन दलाच्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा यावेळी सत्कार झाला.
महापालिकेतर्फे आज सकाळी ९ वाजता उपमहापौर गोंजारे यांच्या हस्ते वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता यांचा सत्कार झाला. (कंसामध्ये शहीद जवानांची नावे) ऊर्मिला मरळे (निवृत्ती मरळे), सुनील कांबळे (सात्ताप्पा कांबळे), सुलोचना रावराणे (लक्ष्मण रावराणे), कांचनदेवी भोसले (जयसिंग भोसले), मधुकर वालकर (शंकर वालकर), सुनीता देसाई (मच्छिंद्र देसाई), आनंदी उलपे (दिगंबर उलपे), मनीषा सूर्यवंशी (अभिजित सूर्यवंशी), व्यंकोजी शिंदे (सत्यजित शिंदे), हरी चिले (सुनील चिले), जाई जाधव (भगवान जाधव), पार्वतीबाई माने (अशोक माने), अंजनी पाटील (श्रीकांत पाटील) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक परीक्षित पन्हाळकर, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, शिक्षण समिती सभापती संजय मोहिते, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे, अश्विनी वाघमळे, नगरसेवक राजू लाटकर, आर. डी. पाटील, भूपाल शेटे, सुभाष रामुगडे, लीला धुमाळ, निशिकांत मेथे, उमेश रणदिवे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, डॉ. विजय पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Felicitates families of heroic soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.