प्रतिक्रिया, फोटो ओळी (विरोध झुगारून नवी कार्यकारिणी मंजूर)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST2020-12-09T04:19:38+5:302020-12-09T04:19:38+5:30
सत्ताधारी गटाचे म्हणणे मुख्याध्यापक संघाच्या घटनेला अधीन राहून, विषयानुरूप सभा घेण्यात आली. यापूर्वी ५५ वर्षे संघाचा कारभार पाहणारे विरोधक ...

प्रतिक्रिया, फोटो ओळी (विरोध झुगारून नवी कार्यकारिणी मंजूर)
सत्ताधारी गटाचे म्हणणे
मुख्याध्यापक संघाच्या घटनेला अधीन राहून, विषयानुरूप सभा घेण्यात आली. यापूर्वी ५५ वर्षे संघाचा कारभार पाहणारे विरोधक हे इतरांना संघात प्रवेश देत नव्हते. आम्ही लोकशाही पद्धतीने सभा घेतली. संघाच्या घटनेतील तरतूद क्रमांक ११ (ए) नुसार वार्षिक सभेत सन २०२०-२०२३ या कालावधीतील नवीन कार्यकारिणी मंजूर झाली आहे. सर्व विषय आवाजी मताने मंजूर झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येईल. त्यांच्या शब्दाचा आदर राखला जाईल, असे संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ आणि सचिव दत्ता पाटील यांनी सांगितले.
विरोधी गटाचे म्हणणे
नवीन कार्यकारिणीसाठीची निवड लोकशाही पद्धतीने झालेली नाही. आम्ही सभेपूर्वीच हरकत नोंदविली असताना विषयपत्रिकेतील पाचव्या क्रमांकाचा विषय हा रीतसर प्रक्रियेद्वारे आणि विनाचर्चा सभेसमोर आला. त्यामुळे आम्ही त्याबाबत विरोध दर्शविला. या सभेची नोटीस अनेक शाळांना मिळालेली नाही. कोविडची स्थिती असतानाही सभेवेळी सोशल डिस्टन्सिंग, आदींची दक्षता सत्ताधाऱ्यांनी घेतली नाही. एकूण पाहता गोंधळ निर्माण होण्यास सत्ताधारी कारणीभूत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या अभिवचनानुसार आम्ही सभेवेळी संयमाची भूमिका घेतली. त्यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आम्ही असल्याचे विरोधी गटातील नेते आणि संघाचे माजी अध्यक्ष व्ही. जी. पोवार यांनी सांगितले.
फोटो (०८१२२०२०-कोल-मुख्याध्यापक सभा ०१) : कोल्हापुरात मंगळवारी मुख्याध्यापक संघाच्या वार्षिक सभेत नवीन कार्यकारिणी निवडीच्या विषयावरून अध्यक्ष सुरेश संकपाळ आणि विरोधक व्ही. जी. पोवार, रंगराव तोरस्कर, आदींमध्ये खडाजंगी झाली. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (०८१२२०२०-कोल-मुख्याध्यापक सभा ०२,०३ आणि ०४) : कोल्हापुरात मंगळवारी मुख्याध्यापक संघाच्या वार्षिक सभेत नवीन कार्यकारिणी निवडीच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधी गटांतील समर्थकांमध्ये हमरीतुमरी, ढकलाढकलीच्या प्रकाराने गोंधळ झाला. (छाया : नसीर अत्तार)