शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क कपात जरा आधी व्हायला हवी होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 17:15 IST

संतोष मिठारी कोल्हापूर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक स्थितीचा विचार करता खासगी शाळांमधील शालेय शुल्कामध्ये (फी) १५ टक्के ...

ठळक मुद्देकोल्हापुरातील पालक, संस्था चालकांचे मत शाळांनी शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी : पालकांनी उर्वरित फी लवकर द्यावी

संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक स्थितीचा विचार करता खासगी शाळांमधील शालेय शुल्कामध्ये (फी) १५ टक्के कपात करण्याचा राज्य शासनाचा निर्णय चांगला आहे. मात्र, हा निर्णय जरा आणखी आधी एप्रिल-मेदरम्यान व्हायला हवा होता, असे मत कोल्हापूर जिल्ह्यातील पालक आणि संस्था चालकांनी व्यक्त केले.

या शासन निर्णयाची शाळांनी तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी पालकांनी केली, तर उर्वरित फी पालकांनी लवकर द्यावी, असे आवाहन संस्थाचालकांनी केले.कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू झाल्या आहेत. या पद्धतीने शाळा सुरू असल्याने काही प्रमाणात शाळांच्या खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे यंदा शंभर टक्के फी आकारण्यात येऊ नये. त्यामध्ये काही प्रमाणात सवलत द्यावी, अशी मागणी पालकांतून झाली होती. त्यावर खासगी शाळांमधील फीमध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय शासनाने बुधवारी जाहीर केला. त्यामुळे पालकांना दिलासा मिळणार आहे.संस्थाचालक काय म्हणतात? 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करून यावर्षी आम्ही शुल्कवाढ केलेली नाही. शासनाने १५ टक्के शुल्क कपातीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पालकांना दिलासा मिळणार आहे.-महेश पोळ,अध्यक्ष, इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन

शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या फीमधून जमा होणाऱ्या रकमेतून खासगी शाळांचा सर्व खर्च चालतो. त्याचा विचार करून पालकांनी उर्वरित फी लवकर देऊन आम्हा संस्थाचालकांना सहकार्य करावे.-डॉ. संदेश कचरे,अध्यक्ष, मॉडर्न शिक्षण संस्थापालक काय म्हणतात? 

कोरोनाच्या स्थितीत शाळांनी आम्हाला मदत केली. शुल्क कपातीचा निर्णय एप्रिल-मेदरम्यान झाला असता, तर अधिक पालकांना ते उपयुक्त ठरले असते. कारण, शुल्क परवडत नसल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेशित केले आहे. शुल्क कपातीच्या निर्णयाला थोडा उशीर झाला.-संजय पटवर्धन,आपटेनगर

फीचा खर्च पेलत नसल्याने अनेक पालकांनी मुलांच्या शाळा बदलल्या आहेत. शासनाने घेतलेला फी कपातीचा निर्णय चांगला; पण तो जरा आधी व्हायला हवा होता. या निर्णयाची शाळांनी तातडीने अंमलबजावणी करावी.-युवराज पाटील, महे

सरकारने भार उचलावासामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने खासगी शाळा चालविणाऱ्या शैक्षणिक संस्थांना राज्य सरकारने या १५ टक्के शुल्क कपातीच्या निर्णयातून सवलत द्यावी. तेथील विद्यार्थ्यांच्या शुल्काचा भार सरकारने उचलावा, अशी मागणी इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे प्रदेश संयोजक ललित गांधी यांनी केली.

  • खासगी अनुदानित शाळा : ७६
  • खासगी विनाअनुदानित शाळा : ३४५
  • पूर्व प्राथमिक (प्री-प्रायमरी) शुल्क : ६ हजार ते ६० हजार रुपये
  • प्राथमिक : १२ हजार ते १ लाख
  • माध्यमिक : १५ हजार ते दीड लाख
टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाkolhapurकोल्हापूर