खासगीकरणामुळे सहकार उद‌्ध्वस्त होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:33+5:302021-02-23T04:36:33+5:30

पेरणोली : शासन सर्वच क्षेत्रांचे खासगीकरण करीत आहे. त्यामुळे दुर्बल व गरिबांचे आधारवड असलेल्या सहकार क्षेत्राचे खासगीकरण झाल्यास भविष्यात ...

Fear of collapse of co-operation due to privatization | खासगीकरणामुळे सहकार उद‌्ध्वस्त होण्याची भीती

खासगीकरणामुळे सहकार उद‌्ध्वस्त होण्याची भीती

पेरणोली : शासन सर्वच क्षेत्रांचे खासगीकरण करीत आहे. त्यामुळे दुर्बल व गरिबांचे आधारवड असलेल्या सहकार क्षेत्राचे खासगीकरण झाल्यास भविष्यात सहकार उद‌्ध्वस्त होणार असल्याची भीती शिवाजी विद्यापीठाचे माजी अर्थशास्त्र प्रमुख डॉ. विजय ककडे यांनी रविवारी व्यक्त केली.

आजरा येथे रवळनाथ हौसिंग फायनान्सतर्फे आयोजित सभासदांना प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. ककडे म्हणाले, सहकार व राजकारण या नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी सत्तेच्या हव्यासापोटी सहकार मोडीत निघाला. सभासद हा मालक असल्याने अशा वेळी हक्क व कर्तव्य बजावले पाहिजे. तरुणांमध्ये सहकार रुजवून सहकार बळकट करणे आवश्यक आहे.

यावेळी प्रा. संभाजी जाधव, अ‍ॅड. एस. एस. गडगे यांनी मार्गदर्शन केले.

संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी प्रास्ताविकात सभासदांसाठी पहिल्यांदाच प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले.

कृष्णा येसणे, डॉ. अंजनी देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी उपाध्यक्ष व्ही. के. मायदेव, शाखाध्यक्ष विनायक आजगेकर, प्रा. डॉ. शिवशंकर उपासे, नूरजहाँ सोलापुरे, उत्तम दळवी, आदी उपस्थित होते. मीना रिंगणे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य राजीव टोपले यांनी आभार मानले.

* फोटो ओळी : आजरा येथील रवळनाथ हौसिंग फायनान्सच्या सभासदांना प्रा. डॉ. विजय ककडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एम. एल. चौगुले, विनायक आजगेकर, संभाजी जाधव, एस. एस. गडगे, व्ही. के. मायदेव, आदी उपस्थित होते.

क्रमांक : २१०२२०२१-गड-०३

Web Title: Fear of collapse of co-operation due to privatization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.