सावित्रीबार्इंच्या नावे पुरस्कार हा माझा गौरव
By Admin | Updated: November 25, 2014 00:00 IST2014-11-24T23:38:34+5:302014-11-25T00:00:55+5:30
रत्नमाला घाळी : करवीर साहित्य परिषदेच्या पुरस्काराचे वितरण

सावित्रीबार्इंच्या नावे पुरस्कार हा माझा गौरव
कोल्हापूर : मी ज्या स्त्रीला दैवत मानत होते त्या आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कार देऊन करवीर साहित्य परिषदेने माझा आयुष्यातला सर्वांत मोठा गौरव केला आहे, असे मनोगत विद्याप्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी यांनी व्यक्त केले.
करवीर साहित्य परिषदेच्यावतीने घाळी यांना प. पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामीजींच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी हा पुरस्कार मिळण्यामागे घाळी परिवार व विद्याप्रसारक मंडळाचा मोलाचा वाटा आहे, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.
लक्ष्मीसेन महास्वामी म्हणाले, क्रांतिज्योती फुले यांनी स्वावलंबी जीवनासाठी स्त्री शिक्षणाचा पाया घालून दिला व त्यांच्याच प्रेरणेने कार्य करणाऱ्या घाळी यांना दिलेल्या या पुरस्कारामुळे सावित्रीबार्इंच्या स्मृतींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. त्यानंतर डॉ ल. रा. नसिराबादकर यांनी संत साहित्याची व परंपरेची उदाहरणे देत स्त्री उद्धारासाठी सावित्रीबार्इंनी केलेले कार्य उलगडले.
यावेळी डॉ. संतोष घाळी, आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य रा. तु. भगत यांनी प्रास्ताविक, संतोष वडेर यांनी सूत्रसंचालन केले. शाम कुरळे यांनी आभार मानले. डॉ. सरोज बिडकर, बाबासाहेब बिडकर यांनी संयोजन केले. ( प्रतिनिधी )
करवीर साहित्य परिषदेच्यावतीने रत्नमाला घाळी यांना प.पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामीजींच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शाम कुरळे, संध्यादेवी कुपेकर, रा. तु. भगत, ल. रा. नसिराबादकर, सरोज बिडकर, आदी उपस्थित होते.