म्हशी घ्यायला बापाने साठवले ७ लाख, मुलाच्या ऑनलाईन गेमने उडाले ५ लाख!

By उद्धव गोडसे | Updated: July 7, 2025 08:11 IST2025-07-07T08:10:58+5:302025-07-07T08:11:42+5:30

राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने म्हशींचा गोठा करून चांगला जम बसवला होता. नवरा-बायको दोघे काबाडकष्ट करून गोठा आणखी वाढविण्याच्या विचारात होते. यासाठी ते बँक खात्यात पैसे साठवत होते.

Father saved 7 lakhs to buy a buffalo, son wasted 5 lakhs on online games! | म्हशी घ्यायला बापाने साठवले ७ लाख, मुलाच्या ऑनलाईन गेमने उडाले ५ लाख!

म्हशी घ्यायला बापाने साठवले ७ लाख, मुलाच्या ऑनलाईन गेमने उडाले ५ लाख!

उद्धव गोडसे

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने म्हशी घेण्यासाठी सात लाख रुपये बँक खात्यात साठवले होते; पण सहावीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलाने मोबाइलवर ‘फ्री फायर’ गेम खेळताना नकळत काही ॲप घेतले आणि काही क्षणात बँक खात्यातील पाच लाखांची रक्कम गायब झाली. खात्यातील पैसे गेल्याच्या मेसेजमधील ट्रान्झेक्शन आयडीवरून सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला. बँक खात्याशी कनेक्ट असलेला मोबाइल नंबर लहान मुलांच्या हाती दिल्यानंतर काय होऊ शकते, याचा धडाच पालकांना मिळाला.

राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने म्हशींचा गोठा करून चांगला जम बसवला होता. नवरा-बायको दोघे काबाडकष्ट करून गोठा आणखी वाढविण्याच्या विचारात होते. यासाठी ते बँक खात्यात पैसे साठवत होते.

शेतकऱ्याची सायबर पोलिसांकडे धाव

मे महिन्यात ते हरयाणातून चार म्हशी आणणार होते. यासाठी बँकेत जाऊन पैशांची माहिती घेताच त्यांना धक्का बसला. त्यात फक्त २ लाख रुपये शिल्लक होते. स्टेटमेंट काढल्यावर खात्यातून ऑनलाइन पैसे गेल्याचे लक्षात आले. बँकेने हात झटकून पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला.  अखेर शेतकऱ्याने सायबर पोलिस ठाणे गाठले.

बँकेचा मेसेज नाही स्टेटमेंटवरुन उलगडा

बँकेतील स्टेटमेंटनुसार मोबाइलमधील मेसेज तपासले.मात्र, त्यात एकही मेसेज नव्हता. ट्रान्झेक्शन आयडीवरून शोध घेतल्यानंतर काही रक्कम फ्री फायर गेममधील आभासी शस्त्र खरेदीसाठी गेल्याचे लक्षात आले.

बरीच रक्कम सायबर गुन्हेगारांनी छुप्या ॲपद्वारे मोबाइलचा ताबा घेऊन विविध खात्यांवर वळविल्याचे स्पष्ट झाले. हा सर्व प्रकार त्यांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाकडून नकळत घडला. 

Web Title: Father saved 7 lakhs to buy a buffalo, son wasted 5 lakhs on online games!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.