पबजी खेळायला विरोध केल्याने वडिलांचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:50 IST2019-09-10T00:50:19+5:302019-09-10T00:50:23+5:30
बेळगाव : मोबाईलवर पबजी खेळणास सतत विरोध करणाऱ्या वडिलांचा मुलाने गळा चिरून खून केला. शंकºयाप्पा रेवप्पा कुंभार (वय ६१, ...

पबजी खेळायला विरोध केल्याने वडिलांचा खून
बेळगाव : मोबाईलवर पबजी खेळणास सतत विरोध करणाऱ्या वडिलांचा मुलाने गळा चिरून खून केला. शंकºयाप्पा रेवप्पा कुंभार (वय ६१, सिद्धेश्वर गल्ली, काकती, बेळगाव) असे मृत पित्याचे नाव आहे. याप्रकरणी रघुवीर कुंभार (वय २१) याला अटक केली आहे. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शंकºयाप्पा तीन महिन्यांपूर्वीच जिल्हा सशस्त्र दलातून निवृत्त झाले होते.
रघुवीर मेकॅनिकल डिप्लोमाच्या दुसºया वर्षात शिकत आहे. तो सतत मोबाईवर पबजी गेम खेळत असत. यामुळे वडिलांनी त्याला अनेकदा समज दिली होती. वडील ओरडतात याच रागातून रघुवीरने रविवारी शेजारील घरांच्या खिडक्यांवर दगडफेक केली होती. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांत गेले होते. रविवारी रात्री घरी आल्यानंतर बाराच्या सुमारास रघुवीर पुन्हा पबजी गेम खेळत होता. हे पाहून वडील रागावले. याचाच राग धरून सोमवारी पहाटे रघुवीरने आई महादेवी यांना घराबाहेर काढले व वडिलांचा गळा दाबून खून केला. यानंतर, विळीने वडिलांचे शीर धडावेगळे केले. त्यांचा डावा पायदेखील कापून बाजूला ठेवला. शेजाऱ्यांनी माहिती पोलिसांना दिली.