शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बुडणाऱ्या लेकीस वाचवले, मात्र स्वत:चा जीव नाही वाचवू शकले; कोल्हापुरातील ह्दयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 11:37 IST

पत्नीने आरडाओरडा केला, मात्र मदतीला कोणी नसल्याने त्यांचा दुर्दैवाने पाण्यात बुडून अंत झाला.

कोल्हापूर : आई-वडिलांसोबत खणीवर कपडे धुण्यासाठी आलेली स्वत:ची शाळकरी मुलगी पाण्यात बुडत असल्याचे पाहून वडिलांनी जीव घोक्यात घालून तिला बाहेर ढकलले; मात्र ते स्वत:चा जीव वाचवू शकले नाहीत. पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी अंत झाला. ही मन हेलावणारी घटना गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे रविवारी दुपारी घडली. सतीश दत्तात्रय गोंधळी (वय ४५) असे मृत वडिलांचे नाव आहे. ऐन यात्रेपूर्वीच घडलेल्या या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.गडमुडशिंगी येथील यात्रेला आज, साेमवारपासून प्रारंभ होणार आहे. घरोघरी यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. रविवारी सकाळी सतीश गोंधळी, पत्नी सिंधू आणि शाळकरी मुलगी तृप्तीसोबत घरातील अंथरूण, पांघरूण असे मोठे धुणे धुण्यासाठी गावातील खाणीवर गेले होते. मुलगी कपडे धुण्यासाठी पालकांना मदत करीत होती.पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडू लागली, हा प्रकार लक्षात येताच पोहता येत नसतानाही वडिलांनी पाण्यात उतरून मुलीला बाहेर ढकलले. मुलगी बचावली; मात्र, तोल गेल्यामुळे वडील पाण्यात बुडाले. पत्नीने आरडाओरडा केला, मात्र मदतीला कोणी नसल्याने त्यांचा दुर्दैवाने पाण्यात बुडून अंत झाला.ऐन यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलीला वाचविताना पित्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेने ग्रामस्थांचे मन हेलावून गेले. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सतीश यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी सकाळी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणे