चिखलीमध्ये पिता-पुत्रास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:14+5:302021-05-05T04:40:14+5:30
कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून झालेल्या वादावादीतून पिता-पुत्रास लोखंडी सळई, काठीने बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. ही घटना करवीर तालुक्यातील ...

चिखलीमध्ये पिता-पुत्रास मारहाण
कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून झालेल्या वादावादीतून पिता-पुत्रास लोखंडी सळई, काठीने बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. ही घटना करवीर तालुक्यातील चिखली येथे सोमवारी रात्री घडली. या हल्ल्यात अशोक कळके व त्यांचा मुलगा पांडुरंग कळके हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिखली (ता. करवीर) येथे अशोक कळके हे शेतातील झाडाखाली बांधलेली जनावरे गोठ्यात नेत होते. त्याचवेळी जनावरांच्या पायाखाली सापडल्याने काही शेणींचे (गोवरी) नुकसान झाले. त्यावरून वाद उफाळला. त्यातून अशोक कळके व पांडुरंग कळके या पिता-पुत्रांना लोखंडी सळीई, काठी व दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पांडुरंग कळके यांनी दिलेल्या तक्रारीवरून सर्जेराव बळवंत कळके, सुरेश कळके, कुणाल कळके, विशाल कळके (सर्व रा. चिखली) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.