टेंबलाईवाडी हल्लाप्रकरणी पिता-पुत्र अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:31 IST2021-06-09T04:31:26+5:302021-06-09T04:31:26+5:30
कोल्हापूर : टेंबलाईवाडीत मंदिर परिसरात दारूच्या नशेत लोखंडी रॉडने हल्ला करून विजय भोला गोसावी (वय ३८, रा. नवदुर्गा गल्ली, ...

टेंबलाईवाडी हल्लाप्रकरणी पिता-पुत्र अटक
कोल्हापूर : टेंबलाईवाडीत मंदिर परिसरात दारूच्या नशेत लोखंडी रॉडने हल्ला करून विजय भोला गोसावी (वय ३८, रा. नवदुर्गा गल्ली, विक्रमनगर) यांना जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी पिता-पुत्राला अटक केली. जमीर मुजावर (वय ३८), त्याचा मुलगा सोहेल मुजावर (दोघेही रा. नवदुर्गा गल्ली, विक्रमनगर) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.
विजय गोसावी व जमीर मुजावर हे मित्रासमवेत एकत्रित दारू पित बसले. एकमेकांकडे बघण्याच्या कारणांवरून व पूर्ववैमनस्यातून दोघांत वादावादी झाली. या वेळी जमीर मुजावर याने लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने विजय गोसावी हे गंभीर जखमी केले. तर सोहेल याने हॉकी स्टिकने हल्ला करत असताना मित्र राजू लटके याने स्टिक पकडली. या हल्ल्ल्यात गोसावी जखमी झाले होते. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली होती, याप्रकरणी जमीर मुजावर व त्याचा मुलगा सोहेल यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता, त्या दोघांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली.