शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
2
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
3
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
4
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
5
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
6
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
7
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
8
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
9
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
10
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
11
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
12
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
13
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
14
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
15
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
16
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
17
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
18
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
19
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
20
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

अल्पवयीन पोटच्या मुलास बापानेच काढले घराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 1:34 PM

आईवडिल मला अभ्यास करू देत नाहीत म्हणून मुलांनेच पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे प्रकरण जामनेर (जि.जळगांव) मध्ये उघडकीस आले असताना तसाच कांहीसा प्रकार येथील इचलकरंजीजवळच्या शहापूरमध्ये घडला आहे. या प्रकरणात आईवडिलांनीच भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मुलास घराबाहेर काढले आहे. गेले कांही महिने हा मुलगा एका कारखान्यात एकटाच राहत असल्याचे निपन्न  झाले. त्यासंबंधीची तक्रार कोल्हापूरातील बालकल्याण समितीकडे झाली. या न्यायालयीन यंत्रणेने या प्रकरणात बालकास संरक्षण दिले असून त्यास बालगृहात प्रवेश दिला आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन पोटच्या मुलास बापानेच काढले घराबाहेरशहापूरमधील प्रकार : कोल्हापुरातील बालगृहात प्रवेश

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : आईवडिल मला अभ्यास करू देत नाहीत म्हणून मुलांनेच पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे प्रकरण जामनेर (जि.जळगांव) मध्ये उघडकीस आले असताना तसाच कांहीसा प्रकार येथील इचलकरंजीजवळच्या शहापूरमध्ये घडला आहे. या प्रकरणात आईवडिलांनीच भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मुलास घराबाहेर काढले आहे. गेले कांही महिने हा मुलगा एका कारखान्यात एकटाच राहत असल्याचे निपन्न  झाले. त्यासंबंधीची तक्रार कोल्हापूरातील बालकल्याण समितीकडे झाली. या न्यायालयीन यंत्रणेने या प्रकरणात बालकास संरक्षण दिले असून त्यास बालगृहात प्रवेश दिला आहे.घडले ते असे : शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्यात नमूद माहितीनुसार आई आणि वडील यांच्यात सातत्याने वाद होत होते. वडिलांकडून आईला शिवीगाळ आणि मारहाण होणे हे पौगंडावस्थेत असणाऱ्या मुलाला सहन होत नव्हते. अखेर मुलाने या भांडणात मध्यस्थी करत समजावण्याचा प्रयत्न केला परंतु जन्मदात्यांना ही मध्यस्थी पचनी पडली नाही. वडिलांना त्याचा प्रचंड राग आला आणि त्यांनी मुलालाच घराबाहेर काढले.

गेले काही महिने हा मुलगा शेजारच्या कारखान्यात एकटा राहतो. आई मात्र या मुलाला सकाळ-संध्याकाळचे जेवण पाठवत असे. इथूनच या मुलाचे शिक्षण सुरू होते. ही अवस्था न पाहवल्यामुळे भावकीतील काही लोकांनी शहापूर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या बाबीचे गांभीर्य ओळखून अल्पवयीन मुलास संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र पोलिसांकडून तसे घडले नाही.बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम १०७ अन्वये प्रत्येक पोलिस ठाण्यात 'बाल कल्याण पोलीस अधिकारी' कार्यरत असतो. कोल्हापूर जिल्ह्यात अधिकृतपणे प्रत्येक पोलीस ठाण्यात असा बाल कल्याण पोलीस अधिकारी कार्यरत आहे. त्याअर्थी शहापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या बाल कल्याण पोलीस अधिकारी यांची या प्रकरणातील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जर या पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे, तर या अधिकाºयाने या प्रकरणात कोणती भूमिका घेतली हे स्पष्ट होण्याची गरज आहे.या प्रकरणातील कांही अनुत्तरित प्रश्र्न१) जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला नको का?२) जन्मदात्यांनी जन्म दिला म्हणजे त्या जीवाचं जगणं किंवा त्याला मारणं हा त्यांचा अधिकार आहे असे समजणे कितपत योग्य आहे? (बाल हक्क संहितेनुसार प्रत्येक बालकाला जगण्याचा अधिकार आहे)३) पोलिसांनी या मुलाच्या काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही का केली नाही?४) प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बाल कल्याण पोलीस अधिकारी नियुक्त केला नसल्यास त्याची कार्यवाही केव्हा केली जाणार?५) कुटुंबातूनच मुलांना सुरक्षितता लाभत नसेल आणि पोलिसांसारखी यंत्रणाही दुर्लक्ष करीत असेल तर बाल हक्कांची जबाबदारी कुणाची?

अशा प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या संदर्भात अत्यंत संवेदनशीलतेने वागणे आवश्यक आहे. या मुलांना जगण्याचे हक्क मिळावेत यासाठी कायदेशीर व्यवस्था आहे परंतू त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा अनुभव या प्रकरणात आला आहे.अतूल देसाईबालकल्याण क्षेत्रातील कार्यकर्ते

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासkolhapurकोल्हापूर