लिंगनूर ग्रामस्थांचे उपोषण

By Admin | Updated: December 11, 2014 00:31 IST2014-12-11T00:13:19+5:302014-12-11T00:31:29+5:30

पंचायत समितीसमोर आंदोलन : नळयोजना कामाची होणार चौकशी; समिती आज गावात

The fasting of the residents of the village of Lingnur | लिंगनूर ग्रामस्थांचे उपोषण

लिंगनूर ग्रामस्थांचे उपोषण

गडहिंग्लज : लिंगनूर काा नूल  (ता. गडहिंग्लज) येथील नळ पाणीयोजना कामाच्या चौकशीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार नळयोजना कामाच्या तपासणीसाठी उद्या, गुरुवारी त्रिसदस्यीय समिती गावाला भेट देणार आहे. मात्र, चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
नवीन वसाहतीमध्ये गोकुळ चिलिंग सेंटरजवळ बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे. निकामी झालेल्या जुन्या जलवाहिनीलाच तीन इंची पाईप जोडून नव्या टाकीत पाणी सोडण्यात आले आहे, असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.नवीन वसाहतीसह गावाला बारमाही व मुबलक पाणी मिळण्यासाठी आंबेओहोळऐवजी हिरण्यकेशी नदीवर जॅकवेल बांधून जुन्या व नव्या टाकीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, सभापती दालनात पंचायत समितीचे पदाधिकारी व आंदोलकांची बैठक झाली. चर्चेअंती नळयोजनेच्या कामाच्या तपासणीसाठी तांत्रिक अधिकाऱ्यांचे पथक पाठविण्याचे आश्वासन उपसभापती तानाजी कांबळे यांनी दिले. मात्र, चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
चर्चेत माजी सभापती अमर चव्हाण, पंचायत समितीचे सदस्य बाळेश नाईक, सहायक गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आर. जी. पाटील, सरपंच काशिनाथ कांबळे, ग्रामसेवक संदीप धनवडे, विश्वनाथ पाटील, तात्यासाहेब पाटील, युवराज मिसाळ, तानाजी जोशिलकर, शंकर कुरळे यांनी भाग घेतला.
आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, ग्राम आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सचिव शशिकांत खांडेकर, राजू झिरले, बसवराज घुगरे, मल्लाप्पा घुगरे, भैरू खांडेकर, संजय जोशिलकर,आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

नळयोजना कामाची आज तपासणी
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन मंजूर आराखड्याप्रमाणे नळयोजनेचे काम झाले आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी शाखा अभियंता कुंभार, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक शेलार व केदार यांची त्रिसदस्यीय समिती उद्या, गुरुवारी लिंगनूर गावाला भेट देणार आहे.

Web Title: The fasting of the residents of the village of Lingnur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.