शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST2021-03-27T04:25:54+5:302021-03-27T04:25:54+5:30
मलकापूर : येळाणे (ता. शाहुवाडी) येथील देव होळी खेळे गावकरी वहिवाटदार असलेल्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम ...

शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण
मलकापूर : येळाणे (ता. शाहुवाडी) येथील देव होळी खेळे गावकरी वहिवाटदार असलेल्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू आहे, ते त्वरित थांबवावे, या मागणीसाठी शाहुवाडी तहसील् कार्यालयासमोर येळाणे ग्रामपंचायतीचे सरपंच मधुकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपोषणालास बसले आहेत. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गाला लागून येळाणे गावची देवस्थानची जागा आहे. त्या जागेवर संदीप पाटील हे अतिक्रमण करून बांधकाम करत आहेत. याबाबत तहसीलदार कार्यालय, शाहुवाडी, जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर, पोलीस निरीक्षक, शाहुवाडी यांना या घटनेबाबत माहिती देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ येळाणे ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. या उपोषणात सरपंच मधुकर पाटील, संजय पाटील, रोहित जांभळे, आनंदा पाटील, बाबुराव पाटील, प्रकाश सुतार, भाऊ गुरव, शिवाजी पाटील, आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.