चंद्रेच्या ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:15+5:302021-07-08T04:17:15+5:30
निकम जून २०१६ पासून येथे कार्यरत आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये सरपंच यांनी मासिक सभा न घेतल्याने तत्कालीन उपसरपंच लता ...

चंद्रेच्या ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण
निकम जून २०१६ पासून येथे कार्यरत आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये सरपंच यांनी मासिक सभा न घेतल्याने तत्कालीन उपसरपंच लता बळवंत पाटील यांच्या सहीने त्यांनी सभा बोलवली. मात्र, या सभेची सूचना दादासो पाटील या सदस्यांना दिली नाही. सभेसाठी सदस्य उपस्थित झाले. मात्र ग्रामसेवक निकम तिकडे फिरकलेच नाहीत. याबाबतची तक्रार १४ डिसेंबरला दिली होती.
दरम्यान, या तक्रारीच्या अनुषंगाने जंगम यांनी केलेल्या चौकशीत तक्रारीत तथ्य आढळले. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी असा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला आहे. याची प्रत उपोषणकर्त्यांना दिली. अन्य तक्रारींबाबत सखोल चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी दादासो पाटील, सचिन पाटील, आण्णासो पाटील, नेताजी साठे, शोभराज सुतार, लता पाटील, रूपाली पाटील, शुभांगी दाभाडे या सदस्यांसह प्रभाकर पाटील, भरत माळवी, भिकाजी हळ्दकर,डी. जी. पाटील,बी. एस. पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.