शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

उत्पन्नाबरोबरच हमीभावामुळे शेतकऱ्यांचा उसाकडेच कल, पर्यायी पिकांतून नुकसानच अधिक 

By राजाराम लोंढे | Updated: November 10, 2023 16:59 IST

कारखानदारांचा काटा काढण्यासाठी शेतकरी ऊस कमी करणार का?

राजाराम लोंढेकोल्हापूर : उसाएवढे उत्पन्न देणारे व हमीभावाचे इतर पिके सध्या तरी शेतकऱ्यांसमोर नाही. केळी, भाजीपाल्यासह इतर पिकांतून नुकसानच अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचा कल ऊस पिकांकडेच अधिक आहे. त्यामुळे ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांचा काटा काढण्यासाठी ऊस कमी करण्याचा सल्ला दिला असला तरी तो शेतकऱ्यांच्या पचनी पडणार का? हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ऊस दराचे आंदोलन पेटले असून, मागील हंगामातील चारशे रुपयांसाठी ‘स्वाभिमानी’ने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत कारखानदारांवर आसूड ओढताना उसाच्या लागणी न करण्याचा सल्ला राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. या सल्ल्याची बुधवारी शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात कोल्हापूर जिल्ह्याच्या हवामानावर पीक पद्धती ठरलेली आहे. बारापैकी दहा तालुक्यात जोरदार पाऊस तर दोन तालुके कमी पावसाचे आहेत. त्यानुसार पिकांची लागवड केली जाते. येथे ४ लाख ४८ हजार हेक्टरपैकी जवळपास ४ लाख हेक्टर खरिपाचे तर २५ हजार हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. यातील सुमारे १ लाख ८६ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो.दर कमी अधिक झाला तरी त्याची गाळप करणारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात व एफआरपीप्रमाणे दर मिळण्याची हमी असते. इतर पिकांसाठी बाजारपेठ शोधावी लागते, तिथे अपेक्षित दर मिळेल याची खात्री नाही. त्यात जिल्ह्यात सरासरी १७५० मिली मीटर पाऊस पडतो. अशा परिस्थितीत इतर पिकांतून चांगल्या उत्पन्न मिळत नाही. शेतकऱ्यांनी यापूर्वी केळी, भाजीपाल्यासह इतर पिके काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यात मोठे नुकसान सोसावे लागल्याने ते शेतकरी पुन्हा उसाकडे वळले आहेत. आता राजू शेट्टी यांनी ऊस कमी करण्याचा सल्ला दिला असला तरी शेतकऱ्यांच्या पचनी पडणार का? हे पहावे लागणार आहे.नदी बुडीत क्षेत्रात इतर पिके तग धरणार का?जिल्ह्यातील प्रमुख नद्या व ओढ्याच्या पुराच्या पाण्यात तब्बल ८० हजार हेक्टर पूर बाधित क्षेत्र आहे. या सर्व क्षेत्रात इतर कोणतेही पीक तग धरणार नाही, त्यामुळेच ऊस पिकाशिवाय येथे दुसरे पीक येऊ शकत नाही.

ऊसच कसा परवडतो...

  • दराची हमी, दराला कायदेशीर संरक्षण मिळते.
  • प्रतिकूल परिस्थितीत येणारे पीक
  • रोगराई, महापुरामुळे नुकसान झाले तरी किमान ५० टक्के उत्पन्नाची हमी
  • मार्केट उपलब्ध असल्याने त्यासाठी मार्केटिंगची गरज नाही.
  • बाजारात घेऊन जावे लागत नाही, कारखाने थेट शिवारात येऊन उसाची उचल करतात.

भाजीपाल्यासह इतर पिके यासाठी अडचणीची

  • बाजारपेठ शोधावी लागते
  • व्यापाऱ्यांच्या हातात दर
  • अनिश्चित भावामुळे नुकसान
  • अतिपावसात कडधान्य, भाजीपाला टिकत नाही.
  • रोगराई व श्रम अधिक घेऊन उत्पन्न कमी
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी