शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: विकासवाडीतील औद्योगिक वसाहतीस शेतकऱ्यांचा विरोध, ..अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 13:06 IST

..त्यामुळे औद्योगिकीकरणास आमचा विरोध

कणेरी : विकासवाडी येथे नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी देण्यास येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. जर सक्तीने भूसंपादन केले तर जन आंदोलन उभारू असा इशारा नेर्ली विकासवाडीचे माजी सरपंच व गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. पत्रकात म्हटले आहे की, विकासवाडी येथे औद्योगिक वसाहत उभी करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच केली. या वसाहतीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, या वसाहतीसाठी जमिनी देण्यास आमचा विरोध आहे. नेर्ली विकासवाडी येथील बहुतांश जमिनी सुपीक व ओलिताखालील आहेत. येथे अल्पभूधारक शेतकरी जास्त आहेत. त्यामुळे बागायत जमिनी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. नेर्ली येथे गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहतीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतजमिनी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. २०१४ साली तत्कालीन गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे नवीन औद्योगिक वसाहतीची पुढील प्रक्रिया थांबवली होती. त्यामुळे आता सक्तीने भूसंपादन केल्यास जन अंदोलन उभे केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.जनावरांसाठी चारा कुठून आणणार?नेर्ली विकासवाडी येथे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पडसर जमिनीचा वापर चराऊ कुरणे म्हणून होत आहे. नवीन औद्योगिक वसाहत तयार झाली तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील औद्योगिकीकरणास आमचा विरोध असल्याचे पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसीFarmerशेतकरी