शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा नादच खूळा! पत्रिका छापून म्हैशीच्या डोहाळे जेवणाचे गावाला दिलं निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 14:14 IST

सोनी या म्हैशीला हिरवी साडी, फुलांच्या माळा, हळदी कुंकू लावून घालून छान नटवण्यात आले.

रवींद्र येसादेभादवण : तुम्ही डोहाळे जेवणाविषयी अनेकदा ऐकलं आणि पाहिलंही असेल. पण आजरा तालुक्यातील चिमणे येथे डोहाळे जेवणाची चर्चा चांगलीच रंगली आहे. ही चर्चा आहे एका म्हैशीच्या डोहाळे जेवणाची… खरं वाटत नाही ना? पण हे खरंय. एका शेतकऱ्याने पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या आपल्या म्हैशीचे डोहाळे जेवण घालत गावाला निमंत्रण दिले. यासाठी त्यांनी चक्क पत्रिका वाटून गावकऱ्यांसह पाहुण्यांनाही आमंत्रित केलं होतं.चिमणे येथील समीर आत्माराम नादवडेकर व सीमा समीर नादवडेकर यां शेतकरी कुटूंबाने आपल्या कुटुंबाच्या लाडक्या असलेल्या सोनी या म्हैशीचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. यासाठी त्यांनी ५०० पत्रिका छापून लोकांना आमंत्रित केलं. डोहाळे जेवण म्हटलं की, मग नटनं आलंच. सोनी या म्हैशीला हिरवी साडी, फुलांच्या माळा, हळदी कुंकू लावून घालून छान नटवण्यात आले.गावातल्या आया-बाया डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी नादवडेकर यांच्या घरी जमा झाल्या. सोनीला मंडपात बांधण्यात आलं. २५० महिलांनी सोनीची ओटी भरत तिला ओवाळलं. त्यानंतर पाच प्रकारची फळे, सुग्रास पेंड, कडधान्ये, गवत सोनीला खाऊ घालण्यात आले.स्वतःच्या मुलांप्रमाणेच नादवडेकर दाम्पत्य जिव्हाळ्याने पशुधनाचा सांभाळ करतात. नादवडेकर कुटूंबियांना आई - वडील, भाऊ व मुले यांची चांगली साथ मिळाली. मायेपोटी चक्क डोहाळे पुरवले आणि धुमधडाक्यात गाव जेवण दिलं. आजवर गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवण घातलेलं आपण पाहिलं आहे. पण हा कृतज्ञता सोहळा वेगळाच होता.सोनीच्या डोहाळ जेवणाचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी, नातेवाईकानी हजेरी लावत जेवणाचा आस्वाद घेतला. नादवडेकर दाम्पत्याने समाजासमोर पशुधन आणि पशुपालक यांच्या नात्यातला आनंद द्विगुणित केला.देखण्या स्पर्धेत प्रथम क्रमांकगडहिंग्लज देखणी रेडी स्पर्धा भरवण्यात आली होती . यावेळी ८६ रेडी मध्ये सोनीने प्रथम क्रमांक मिळवला होता. सोनी रेडीच्या हौसे पोटी तिचे डोहाळ जेवण करून गावकरी व नातेवाईकांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. यातून पशुधना बाबत ग्रामस्थांना प्रेरणा मिळेल असे मत समीर नादवडेकर यांनी व्यक्त केले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी