गुळाचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल
By Admin | Updated: December 5, 2014 00:22 IST2014-12-04T23:53:48+5:302014-12-05T00:22:18+5:30
बैठकीची मागणी : शेतकरी, अडते, व्यापारी अडचणीत

गुळाचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे दर एकदमच खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दर तीन हजारांपेक्षा खाली आल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. यासाठी शेतकरी, अडते, व्यापाऱ्यांची बैठक बोलावण्याची मागणी आज, गुरुवारी गूळ उत्पादक शेतकरी असोसिएशनने बाजार समितीकडे केली आहे.
गुळाचे गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर घसरले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गुळाचा दर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल होता.
त्या तुलनेत यावर्षी दर प्रतिक्विंटल पाचशे रुपयांनी कमी झाला आहे. परिणामी गूळ उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहेत. आज गुऱ्हाळघरे चालवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. यासाठी आज जिल्हा गूळ उत्पादक शेतकरी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह शिष्टमंंडळाने प्रशासनाची भेट घेतली. दराबाबत समितीने गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती शिष्टमंडळाने समितीला केली. कारखान्यांची पहिली उचल व गुळाचा उत्पादन खर्च पाहता गुळाचा दर प्रतिक्विंंटल ३५०० रुपयांच्या खाली येऊ नये, याची खबरदारी व्यापारी व अडत्यांनी घ्यावी. यासाठी शेतकरी, अडते व व्यापाऱ्यांची बैठक बोलवावी, अशी मागणी केली.
हंगामआवक रवेदर रुपये प्रतिक्विंटलसरासरी दर
२ डिसेंबर २०१३४ लाख ८७ हजार३५०० ते ३७००३५००
२ डिसेंबर २०१४४ लाख २१ हजार२९०५ ते ३२४०३१००