शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Kolhapur: ‘भूमी अभिलेख’च्या लुटीत शेतकऱ्यांची फरफट, अधिकारीच सापडल्याने लाचखोरी चव्हाट्यावर 

By भीमगोंड देसाई | Updated: January 5, 2024 17:08 IST

पैसे घेण्यासाठीही शौचालयाचा वापर

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : भूमी अभिलेखचे जिल्ह्याचे प्रमुखच कार्यालयात लाच घेताना सापडल्याने भूमी अभिलेखमधील चोर बाजार चव्हाट्यावर आला आहे. याचा सर्वाधिक फटका गरीब, सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांची फरफट होत आहे. त्याची कोणीही दाद घेत नसल्याने शेवटी तो प्रशासनातील लाचखोर अधिकारी, कर्मचारी किंवा एजंटास मागेल तितके पैसे देऊन काम करून घेतो. या लुटीतील प्रमुख सूत्रधार भूमी अभिलेख कार्यालय परिसरातील झेरॉक्स सेंटरवाला असतो. या सेंटरचे मालक आणि कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असतात. यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील नक्कल काढण्यासाठीचा किंवा मोजणीचा अर्ज द्यायचे की नाही, हे तो झेरॉक्स चालकच ठरवत असल्याच्याही तक्रार आहेत.

भूमी अभिलेख कार्यालयात आल्यानंतर त्याच दिवशी काम झाले, असे फार क्वचित वेळा होते. मोजणीचा अर्ज करण्यासाठी आल्यानंतर त्याच्यासोबत जोडण्यासाठीचा नकाशा आणि नऊ चार नऊ तीन काढण्यासाठी झेरॉक्स चालकातर्फे खासगी उमेदवारांकडे जावे लागते. तो सुरुवातीला आता नाही वेळ लागेल उद्या देतो, अशी उत्तरे देतो. अर्जंट आहे, असे सांगितल्यानंतर शोधाशोध करतो.

काही वेळानंतर बाहेर येऊन जुने रेकॉर्ड सापडत नाही, असे सांगतो. मग काय असेल ते देतो, असे म्हटल्यानंतर नक्कल काढून देतो. यासाठी १०० ते २०० रुपये उकळतो. काही वेळा कोल्हापूरहून रेकॉर्ड आणायचे आहे, असे सांगून ५०० ते हजार रुपयेही घेतले जातात. जमिनीची फाळणी करणे, तक्रारीची सुनावणी घेऊन निकाल देण्यासाठी मालमत्ता किती किमतीची आहे, त्यावरून लाच घेतली जाते. लाच दिली की साध्या मोजणीच्या पैशात अती तातडीची मोजणी करून दिली जात आहे. 

कार्यालयीन चुकीचा मनस्तापहीमालमत्ता पत्रकातील नाव चुकवणे, अंतर बदलणे अशा कार्यालयीन चुकीचा मनस्तापही संबंधित मालमत्ताधारकांना होत आहे. स्वत:ची चूकही दुरुस्त करण्यासाठी अनेकवेळा हेलपाटे मारायला लावले जाते. यातूनही पैसे गोळा केले जात असल्याचा आरोप होत आहे.स्वयंघोषित नियममहिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोजणीचे अर्ज स्वीकारायचे नाहीत, आवक-जावकमध्ये अर्ज नोंदणीसाठीही अधीक्षकाची परवानगी घेणे, मोजणीसाठी कोणाचा अर्ज स्वीकारायचा, याचे स्वयंघोषित नियम त्या कार्यालयातील अधीक्षक घेतात. वशिला असेल आणि पैसे मोजले की सर्व नियम शिथिल केले जातात.

पैसे घेण्यासाठीही शौचालयाचा वापरकार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा गर्दी अधिक असल्यास शौचालयात लाचेचे पैसे स्वीकारले जात आहेत. गडहिंग्लज भूमी अभिलेख कार्यालयात तर एक माजी साहेब ड्रॉव्हर उघडे ठेवायचे त्यामध्ये पैसे ठेवून गेले की ते नंतर मोजून खिशात घालत होते. त्यानंतर प्रकरण निर्गत करीत होते. कोल्हापुरात राहणारे अनेक अधिकारी, कर्मचारी चारचाकी वाहनातून रोज ये-जा करतात. हे अधिकारी सर्वाधिक वरकमाई करीत असल्याचा आरोप होत आहे.

सर्वाधिक प्रलंबित करवीर तालुक्याततालुकानिहाय मोजणीची प्रलंबित प्रकरणे अशी : करवीर : ५५५, हातकणंगले : ३६६, शिरोळ : २३४, कागल : ४१७, आजरा : ३२८, चंदगड : ९८, गडहिंग्लज : १६९, पन्हाळा : ४३५, शाहूवाडी : ४२४, राधानगरी : ०, भुदरगड : २२३, गगनबावडा : ७२.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणFarmerशेतकरी