शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी, मात्र नेमक्या अडचणी काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 12:27 IST

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू

विश्वास पाटीलकोल्हापूर : मागणीच्या तुलनेत होत असलेला कमी पुरवठा हेच शेती पंपांना दिवसा वीज देण्याला मुख्य अडसर असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शेतीला दिवसा वीज पुरवठा का केला जात नाही हे ‘लोकमत’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याचा त्रास कसा कमी होईल, असा प्रयत्न होण्याची गरज आहे.महाराष्ट्रात सध्या ८० टक्के वीज निर्मिती हे कोळशापासून होते. उर्वरित वीस टक्के ही पाण्यापासून, सोलर व पवनचक्क्यापासून होते. कोळशाच्या दराशी विजेचा दर जोडल्यास प्रति युनिट ५ रुपये ५० पैसे दराने वीज खरेदी करावी लागेल; परंतु महावितरण शेतीसाठी ही वीज सव्वा ते दीड रुपयांनी उपलब्ध करून देते.

सध्या महावितरणची २० ते २३ हजार मेगावॅट वीज पुरवठ्याची क्षमता आहे; परंतु ही मागणी सायंकाळी ६ ते रात्री १० या काळात ४० हजार मेगावॅटपर्यंत जाते. अशा वेळी भारनियमन करणे किंवा टप्पे करून वीज पुरवठा करण्याशिवाय दुसरा मार्गच नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे.पाणी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा साठा करता येतो तसा विजेचा करता येत नाही. कोणत्या भागात कोणत्या काळात कोणत्या ग्राहकांचे भारनियमन करावे, याचा निर्णय कळवा (जि. ठाणे) येथील लोड डिस्पॅच सेंटरमधून होतो. भारनियमनाचे वेळापत्रक ठरवताना ते पूर्ण राज्यासाठी केले जाते. त्यामुळे एका जिल्ह्याला त्यातून बाहेर काढणे शक्य नाही.

दिवसा वीज पुरवठा करायचा झाल्यास खासगी कंपन्याकडून जास्त दराने वीज खरेदी करावी लागेल व ती कृषी पंपांना पुरवठा करायचा झाल्यास त्याचा दर वाढू शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी महावितरणने सौर कृषी पंपाचा पर्याय पुढे आणला; परंतु तो स्वीकारण्याची शेतकऱ्यांची फारशी मानसकिता नाही.

दृष्टिक्षेपात कृषी पंप

  • राज्यातील एकूण कृषी पंप : ४४ लाख ४९ हजार ४९५
  • कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पंप : १ लाख ४६ हजार
  • पैसे भरून प्रलंबित असलेले जिल्ह्यातील वीज कनेक्शन्स : ४ हजार
  • सरासरी दर : १.२५ ते १.५० रुपये प्रति युनिट
  • वीज बिल आकारणी : दर तीन महिन्यांनी
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीज