शेतकरी सुखी तर देश सुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST2021-06-23T04:17:10+5:302021-06-23T04:17:10+5:30
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करताना या ...

शेतकरी सुखी तर देश सुखी
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करताना या क्षेत्रात नवीन्यपूर्ण संशोधन होणे काळाची गरज आहे. त्यासाठी संशोधन केंद्रांची आवश्यक आहे. केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर करायच्या असतील तर शासन, उद्योगपती, शेतकरी यांनी एकत्र येऊन या क्षेत्रास भरीव मदत वाढविण्याची गरज आहे. शेतकरी जगला तर देश जगेल हे साधे समीकरण आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. आपल्या बळीराजाला, कष्टकरी जगाच्या पोशिंद्याला सुखी ठेवायचे तर केंद्र व राज्य शासनाच्या योजना ग्रामपातळीपर्यंत पोहोचविल्या पाहिजे. त्याचा प्रचार, प्रसार केला पाहिजे. जेणेकरून त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ या शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे त्याचा फायदा होईल.- बाजीराव शिंदे,
भोईगल्ली, कोल्हापूर.