सर्पदंशाने शेतमजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:22+5:302021-07-21T04:18:22+5:30
पोलीस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, शिवाजी हा शेतमजुरीची कामे करीत होता. विशेषत: तणनाशक व कीटकनाशके फवारण्याच्या कामात तो ...

सर्पदंशाने शेतमजुराचा मृत्यू
पोलीस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, शिवाजी हा शेतमजुरीची कामे करीत होता. विशेषत: तणनाशक व कीटकनाशके फवारण्याच्या कामात तो तरबेज होता. रविवारी (दि. १८) रोजी तो इंचनाळ येथील नाईक यांच्या उसाच्या शेतात तणनाशक फवारणीच्या कामासाठी गेला होता. औषध फवारणी करीत असताना त्याला विषारी सापाने दंश केल्यामुळे तो सरीतच कोसळला होता. नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी एका धर्मादाय रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
उत्तरीय तपासणीनंतर गावातील थळदेव मंदिरानजीकच्या शेतवडीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
वैद्यकिय अधिक्षक डॉ. बालाजी साळुंखे यांच्या वर्दीवरून या घटनेची गडहिंग्लज पोलिसात नोंद झाली आहे.
शिवाजी कांबळे : २००७२०२१-गड-०९