कासारवाडीत वीज पडून शेतमजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:00+5:302021-05-08T04:26:00+5:30

वीज कोसळून शेतमजूर ठार झाल्याची घटना कासारवाडी येथे शुक्रवारी घडली. भरत संभाजी वाणी (वय ३५, रा. मूळ गाव ...

Farmer killed in lightning strike in Kasarwadi | कासारवाडीत वीज पडून शेतमजूर ठार

कासारवाडीत वीज पडून शेतमजूर ठार

वीज कोसळून शेतमजूर ठार झाल्याची घटना कासारवाडी येथे शुक्रवारी घडली. भरत संभाजी वाणी (वय ३५, रा. मूळ गाव निर्मळवाडील तावडवणी, जि. बीड. सध्या राहणार मंडलिक मळा टोप, कासारवाडी) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. कासारवाडी येथील शरद मंडलिक यांच्या शेतामध्ये भरत वाणी गेल्या चार-पाच वर्षांपासून कामाला होता. शुक्रवारी भरत उसाच्या शेतीला पाणी पाजत मुले करण व अर्जुनसह लिंबाच्या झाडा खाली उभा होता. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विजांसह पावसाला सुरुवात झाली. यावेळी वीज शेताच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर कोसळल्याने भरत वाणी यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा करण किरकोळ जखमी झाला. घटनास्थळी त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.

Web Title: Farmer killed in lightning strike in Kasarwadi