पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:28 IST2021-09-05T04:28:06+5:302021-09-05T04:28:06+5:30
हेरले : हेरले (ता. हातकणंगले) येथील वसंत दत्तू माने (वय ५०) शेताकडून घरी येत असताना पाय धुण्यासाठी ...

पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
हेरले : हेरले (ता. हातकणंगले) येथील वसंत दत्तू माने (वय ५०) शेताकडून घरी येत असताना पाय धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला.
माहिती अशी की, शुक्रवार दि. ३ रोजी नेहमीप्रमाणे पंचगंगा नदीकडे आपल्या शेतात गेले होते. दुपारी घरी परतत असताना हातपाय धुण्यासाठी ते मगदूम यांच्या विहिरीत गेले होते. पाय घसरून पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. कुटुंबातील लोकांनी शोधाशोध केली; पण ते आढळून आले नव्हते. आज शनिवार दि. ४ रोजी सकाळी एक मृतदेह विहिरीत तरंगताना दिसून आल्याने माने यांच्या नातेवाइकांनी खातरजमा करून घेतली. हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे.