शेतकऱ्याला मारहाण : नगरसेवकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:56+5:302021-08-27T04:27:56+5:30
त्या घटनेची अधिक माहिती अशी की, निपाणी नजीकच्या बुदलमुख येथील शेतकरी सुशांत आबासाहेब कडाकणे हे नेहमी निपाणी येथील आंबा ...

शेतकऱ्याला मारहाण : नगरसेवकाला अटक
त्या घटनेची अधिक माहिती अशी की, निपाणी नजीकच्या बुदलमुख येथील शेतकरी सुशांत आबासाहेब कडाकणे हे नेहमी निपाणी येथील आंबा मार्केट येथे भाजीपाला घेऊन येत असतात. बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे ते आपला भाजीपाला घेऊन आंबा मार्केट परिसरात आले होते. यावेळी वाहन समोर लावण्यावरून बडेकर यांच्या सहकाऱ्यांबरोबर सुशांत यांचे भांडण झाले. भांडण वाढत गेल्यानंतर नगरसेवक शेरू बडेकर हे घटनास्थळी आले. यानंतर वाद वाढत गेल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. बडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जबर मारहाण केली. त्यामध्ये सुशांत याचा हात मोडला असून, दुखापत झाली आहे. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली; मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आबासाहेब बाळगोंडा कडाकणे यांनी याबाबत फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी शेरू बडेकर यांना अटक करून न्यायालयात हजर केले. याप्रकरणी सद्दाम बडेघर, इमरान बडेघर, अरिफ हदाळे, जयत मुजावर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.