शेतातील विद्युत पंप, व्हॉल्व्ह चोरटा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:27+5:302020-12-13T04:39:27+5:30
कोल्हापूर : गगनबावडा आणि करवीर तालुक्यांतील शेतात बसवलेले विद्युत पंप आणि व्हॉल्व्ह चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. ...

शेतातील विद्युत पंप, व्हॉल्व्ह चोरटा गजाआड
कोल्हापूर : गगनबावडा आणि करवीर तालुक्यांतील शेतात बसवलेले विद्युत पंप आणि व्हॉल्व्ह चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. सुनील बापू तळप (वय ३९, रा. गोगवेपैकी तळपवाडी, ता. शाहूवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून दोन विद्युत पंप आणि दोन व्हॉल्व्ह असा ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपासासाठी संशयिताला करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गगनबावडा तालुक्यातील सरस्वती नदीकाठी सरदार पाटील यांनी शेतीसाठी पाईपलाईन टाकून त्यावर व्हॉल्व्ह बसवले होते. दि. १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान अज्ञाताने या व्हॉल्व्हची चोरी केली होती. तसेच केर्ली (ता. करवीर) येथील उत्तम चौगुले यांची दोन हॉर्सपॉवरचा विद्युत पंप तसेच पडवळवाडीतील केरबा माने यांचा पाच हॉर्सपॉवरच्या विद्युत पंपाची दि. १४ नोव्हेंबरला अज्ञाताने चोरी केली होती. या चोऱ्यांच्या गगनबावडा व करवीर पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंद आहेत. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सुनील तळप याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.
(तानाजी)