उंदरवाडीतील त्या कुटुंबाला मिळाली धान्य स्वरूपात मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:34+5:302021-07-04T04:17:34+5:30
बोरवडे : उंदरवाडी ( ता. कागल ) येथील गावपाळक सादवणाऱ्या मंगल कांबळे यांच्या कुटुंबाला बोरवडेच्या सदाशिव मारुती परीट यांनी ...

उंदरवाडीतील त्या कुटुंबाला मिळाली धान्य स्वरूपात मदत
बोरवडे : उंदरवाडी ( ता. कागल ) येथील गावपाळक सादवणाऱ्या मंगल कांबळे यांच्या कुटुंबाला बोरवडेच्या सदाशिव मारुती परीट यांनी धान्य स्वरूपात मदत दिली. याबाबत लोकमतमध्ये शनिवारच्या अंकात मंगल कांबळे यांच्या कुटुंबाला मदतीची गरज असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेत परीट कुटुंबीयांनी तांदूळ, ज्वारी, तेल आदी जीवनावश्यक वस्तू देत मदत केली. यावेळी सदाशिव परीट आणि त्यांचे मुलगे निखिल व श्रीनाथ परीट यांच्या हस्ते कांबळे कुटुंबाला ही मदत घरपोच देण्यात आली.
यावेळी सरपंच भारती पाटील, संजय पाटील, मारुती हरी पाटील, बाबुराव पाटील, ग्रा.पं. सदस्य अमोल गुरव, माजी उपसरपंच एस.व्ही. पाटील, साताप्पा कांबळे, जोतिराम कांबळे, दत्तात्रय वारके, सचिन खाडे, प्रमोद कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
०३ उंदरवाडी मदत
फोटो ओळी :
उंदरवाडी (ता.कागल) येथील गावपाळक सादवणाऱ्या मंगल कांबळे यांना धान्य स्वरूपात मदत देताना सदाशिव परीट, निखिल परीट,श्रीनाथ परीट व इतर