शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वळीव बरसला, चिंता मिटली, दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 14:10 IST

अडीच महिन्यापासून पाठ फिरवलेल्या पावसाने वायू चक्रीवादळाच्या रुपाने का होईना कोल्हापुरात दमदार एन्ट्री केल्याने बळीराजा सुखावला असून त्याची चिंता कांहीअंशी मिटली आहे.

ठळक मुद्देवळीव बरसला, चिंता मिटली, दमदार पावसाने शेतकरी सुखावलापेरण्यांना सुरुवात, उभ्या पिकाला जीवदान

कोल्हापूर: अडीच महिन्यापासून पाठ फिरवलेल्या पावसाने वायू चक्रीवादळाच्या रुपाने का होईना कोल्हापुरात दमदार एन्ट्री केल्याने बळीराजा सुखावला असून त्याची चिंता कांहीअंशी मिटली आहे. पावसाअभावी भेगाळलेल्या जमिनींचीही तहान भागली आहे. पुरेसा ओलावा झाल्याने मशागत करुन ठेवलेल्या शिवारांमध्ये पेरणीची लगबगही सुरु झाली आहे. पाण्याअभावी करपणाऱ्या पिकांसाठी हा पाउस संजीवनी देणारा ठरला आहे. बऱ्याच प्रतिक्षेनंतर आगमन झालेल्या पावसात न्हाउन निघण्याचा आनंद अख्खी सृष्टी अनुभवत आहे.मान्सूनचे आगमन आणखी दोन दिवस लांबणीवर पडले असलेतरी अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळामुळे कोकण, मुंबई, मध्यमहाराष्ट्रासह दक्षिण महाराष्ट्रातही पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवार, मंगळवारी रात्री तासभर पावसाने चांगली हजेरी लावली.

आभाळ भरुन येत होते, पण जोराचा पाउस पडत नव्हता. बुधवारी सकाळी पावसाला सुरुवात झाल्याने प्रतिक्षा संपल्याचे वाटप असतानाच दुपारी परत उन पडले, पण अधेमधे एखादी येणारी सर दिलासा देउन जात होती. संध्याकाळी साडेपाचनंतर मात्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. जवळपास दीडतासाहून अधिक काळ पाउस पडला.जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १४५.६२ मिलीमीटर पाउस नोंदवण्यात आला. यात सर्वाधिक ३८ मिलीमीटर पाउस गगनबावड्यात झाला. चंदगडमध्ये २४.३३ तर आजºयात १३ आणि करवीरमध्ये १२. २७ मिलीमीटर तर भूदरगडमध्ये ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कागल, हातकणंगले, शिरोळमध्ये सर्वात कमी म्हणजे ३ ते ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

उर्वरीत तालुक्यात चांगला पाउस झाल्याने शेतकऱ्यांची पिकांची चिंता मिटली आहे. पेरणीयोग्य पाउस असल्याने आणि चार दिवसात मान्सूनचे आगमन होणार असल्याने पेरणी आटोपून घेण्याच्या नियोजनात शेतकरी आहे. भात, सोयाबीन, भूईमुगाच्या पेरण्या आता वेग घेणार आहेत. राने तयार असल्याने आता केवळ टोकण करण्याचे काम शिल्लक राहिले आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर