शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू; कोल्हापुरातील लोणार वसाहतीत घडली दुर्देवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 12:09 IST

मामाकडे जायचा थांबला अन्..

कोल्हापूर : राजर्षी शाहू मार्केट यार्डपासून जवळ असलेल्या लोणार वसाहतीमधील सिमेंट पाइप कारखान्यात पाण्याच्या टाकीत पडून तैमूर शाहरूख मुल्ला (वय पावणेदोन वर्ष) याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ६) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. वडिलांनी टाकीतून बाहेर काढून मुलास सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील शाहरूख मुल्ला हे लोणार वसाहतीत एका सिमेंट पाइप कारखान्यात वॉचमनचे काम करतात. कारखान्याच्या आवारातील एका खोलीत ते पत्नी आणि दोन लहान मुलांसह राहतात. रविवारी कारखान्याला सुटी होती. त्यांचा पावणेदोन वर्षांचा मोठा मुलगा तैमूर हा खोलीबाहेर खेळत होता, तर आई, वडिलांसह इतर नातेवाईक खोलीत होते.

काही वेळाने तैमूर बाहेर दिसत नसल्याने नातेवाइकांनी शोध सुरू केला. त्यावेळी तो पाण्याच्या टाकीत पडल्याचे लक्षात आले. तातडीने त्याला बाहेर काढून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.मामाकडे जायचा थांबला अन्..गेल्या सहा महिन्यांपासून तैमूर मामाकडे राहत होता. शुक्रवारी तो आजीसोबत आई-वडिलांकडे आला होता. शनिवारी रात्री ते परत जाणार होते. पण, रविवारी कामाला सुटी असल्याने वडिलांनी त्याला आणि त्याच्या आजीला थांबवून घेतले. शनिवारीच तो आजोळी गेला असता तर ही दुर्घटना टळली असती, असे म्हणत त्याच्या आईने सीपीआरच्या अपघात विभागासमोर हंबरडा फोडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर