गगनबावडा मार्गावर पडलेले झाड देते अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:30+5:302021-05-12T04:25:30+5:30
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा पुलाच्या पश्चिमेला दोनवडे बाजूला विलाई चिंचेचे मोठी झाडे आहेत. वाऱ्यामुळे ...

गगनबावडा मार्गावर पडलेले झाड देते अपघाताला निमंत्रण
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा पुलाच्या पश्चिमेला दोनवडे बाजूला विलाई चिंचेचे मोठी झाडे आहेत. वाऱ्यामुळे सायंकाळी पाचच्या सुमारास एका मोठ्या झाडाची मोठी फांदी मोडून रस्त्याच्या कडेला पडली.
यावेळी नागरिकांनी चिंचा तोडण्यासाठी एकच गर्दी केली होती. आणि मोठ्या उतारावर हा भाग असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची काही काळ कोंडी झाली. काटेरी झाड असल्यामुळे झाड हटवण्यासाठी जेसीपीची गरज आहे. तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहनचालकांना फांदी रस्त्यात पडलेली न दिसल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेऊन फांदी हटवावीत अशी मागणी होत आहे.