शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

कोल्हापुरातील धामोडमध्ये बनावट नोटांचा सुळसळाट, बाजारपेठेत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 12:26 IST

नोटा चलनात कोणी व कशा आणल्या याचा पोलिसांनी छडा लावणे गरजेचे

श्रीकांत ऱ्हायकरधामोड : धामोड (ता .राधानगरी ) येथील बाजारपेठेमध्ये गेल्या दोन दिवसापासून शंभर रुपयाच्या बनावट नोटा आल्याचे काही व्यापाऱ्यांना निदर्शनास आले. त्यामुळे धामोड परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या बनावट नोटा चलनात कोणी व कशा आणल्या याचा पोलिसांनी छडा लावणे गरजेचे आहे.धामोड हे बाजारपेठेचे गाव असल्याने या गावचा परिसरातील चाळीस वाड्या -वस्त्यांशी संपर्क असतो. आज सकाळी येथील काही व्यावसायिकांच्या चलनामध्ये शंभर रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. तेव्हा काही व्यावसायिकांनी एकमेकाकडे विचारना करताच चलनात नोटा असल्याची बातमी सर्वत्र पसरली. त्यात आज आठवडी बाजार असल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. धामोड ही मोठी बाजारपेठ आहे. त्यात येथे आठवडी बाजाराच्या निमित्ताने कोल्हापूर पासून ते कर्नाटक पर्यंतचे अनेक व्यापारी येत असतात.येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, दोन मोठे व्यापारी मंडळे, पतसंस्था असल्याने दर दिवसा लाखो रुपयाची उलाढाल होत असते. त्यामुळेच काही अज्ञातानी या नोटा या बाजारपेठेमध्ये खपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन या नोटा कोणी व कशा खपवल्या याचा तपास होणे गरजेचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी